भडगावात संत रविदास महाराज जयंती साजरा
खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड यांचा भक्त गीतांचा कार्यक्रम संपन्न
भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
संत शिरोमणी रविदास महाराज यांची ६४८ वी जयंती निमित्त भडगाव शहरात सजविलेल्या पालखीत मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक संत रविदास मंदिरापासून आजाद चौक, खोल गल्ली, मेन रोड, बस स्थानक, या परिसरातून काढण्यात आली.
यावेळी शहरातील महात्मा फुले चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, विर एकलव्य चौक, या ठिकाणीं महापुरुषांना मल्यार्पण करण्यात आले. मिरवणुकीत महिलांनी भक्तीपर गाण्यांवर फुगड्या खेळून मिरवणुकीची शोभा वाढवली तसेच रात्री नऊ वाजता आझाद चौक येथे खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड आबा चौधरी, धीरज चौधरी यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, श्री.श्री. १००८ महामंडलेश्वर पूजा माई नंदगिरी, तहसीलदार शितल सोलाट,पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, संतोष महाजन, डॉ. विजय देशमुख, जग्गू भोई, सुनील देशमुख, दादाभाऊ भोई, आबा चौधरी, नाना मोरे, पत्रकार सागर महाजन, नितीन महाजन, जावेद शेख, संजय पवार, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष रवी अहिरे, अविनाश अहिरे, सुधीर अहिरे, प्रा. दिनेश तांदळे, नाना अहिरे, नथू अहिरे, ललित अहिरे, दिलीप वाघ, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण महाजन सर यांनी केले.