भडगावात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

तहसीलदारांनी केले तात्काळ समस्यांचे निराकरण

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ संघटनेच्या भडगाव तालुका वतीने आज सकाळी दहा वाजेपासून भडगाव तहसील कार्यालय समोर विविध मागण्यांसाठी शेतकरी आमरण उपोषणास बसले होते . याबाबत तहसीलदार शितल सोलाट यांनी उपोषण स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्याचे तात्काळ निवारण करून उपोषण सोडवले.

उपोषणात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या यामध्ये गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले शिव रस्ते /शेत रस्ते / पाणंद / पांदण / शिवार रस्ते / शेतावर जाण्याचे पाय मार्ग कालबध्द कार्यक्रमानुसार खुले करण्यासाठी बैठकी, तहसिल कार्यालयावरील प्रलंबित शेतरस्ता केसेस तातडीने निकाली काढणे,

शासन निर्णयाप्रमाणे नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी त्वरित करावी, तहसिल कार्यालयात तहसिलदारांसमवेत शेतरस्त्यांसंबंधीत विभागांसोबत शेतकऱ्यांची समन्वय बैठक घेऊन शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा.

आदी मागण्यासाठी लक्ष्मण पाटील, देविदास महाजन, रामदास माळी, युवराज पाटील, अशोक पाटील, दिनकर पाटील, नीलकंठ पाटील, युवराज पाटील, वैशाली पाटील, बेबाबाई पाटील, देवराम माळी, सुनील जोशी, सुरेश पाटील, राजू मोरे,  शेतकरी उपोषणास बसले होते. यावेळी तहसीलदार शितल सोलाट यांनी उपोषण स्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या समस्यांचे व मागण्यांचे निराकरण करत उपोषण सोडवले.

Leave A Reply

Your email address will not be published.