अवैध वाळू वाहतूक : उपोषण काही दिवसांसाठी स्थगित

पुन्हा उपसा सुरू झाल्यास आंदोलन , वडजी ग्रामस्थांचा बैठकीत इशारा

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

तालुक्यातील वडजी ग्रामपंचायत सदस्यांनी गिरणा नदी पात्रातुन होत असलेल्या अवैध वाळू उपसासंदर्भात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. आंदोलनाची दखल घेत तहसीलदार शितल सोलाट यांनी दोन वेळेस वडजी गावात बैठका घेतल्या. तर वडजी गावाच्या हद्दीतून होणारी वाळू चोरीला 4-5  दिवसांपासून अटकाव केल्याने 26 जानेवारीला करण्यात येणारे उपोषण करू नये अशी विनंती तहसीलदारांनी केली. मात्र तुर्तास उपोषण मागे घेत असलो तरी पुन्हा उपसा सुरू झाल्यास यापेक्षा अधिक जोमाने आंदोलन करू असे ग्रामस्थांनी सांगीतले.

वडजी गावाच्या हद्दीतून वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रातुन मोठ्याप्रमाणात  अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या वडजी, रोकडाफार्म, वडगाव-नालबंदि, रूपनगर-पळासखेडे, महींदळे या गावाच्या पाणी पुरवठा योजनाच्या विहरींना धोका निर्माण झाला आहे. तर शेतीसाठी असलेल्या विहीरींना फटका बसण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सुधाकर पाटील, वडजीचे उपसरपंच दिनेश परदेशी, माजी उपसरपंच स्वदेश पाटील यांनी

तहसीलदार शितल सोलाट यांना निवेदन देऊन वडजी हद्दीतून होणारा वाळू उपसा न थांबल्यास 26 जानेवारी पासून गिरणा नदी पात्रात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.

 

तहसीलदारांची दोनदा बैठक 

निवेदनाची दखल घेत तहसीलदार शितल सोलाट यांनी त्याच दिवशी वडजी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन वाळूचोरी संदर्भात सरपंचांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. तर काल (ता.23) रोजी पुन्हा ग्रामस्थांच्या उपस्थित मारोती मंदिरावर बैठक घेतली. यावेळी त्यांनी सांगतीले की, वडजी गावातुन होणाऱ्या वाळूचोरी संदर्भात प्रशासनाने कठोर पाऊले उचलले आहेत. याठिकाणची वाळूचोरी गेल्या आठवड्यापासून थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर याठिकाणी गस्ती पथकाची नियुक्ती केलेली आहे. येथून वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासन पुर्णपणे कटिबध्द असल्याचे तहसीलदार शितल सोलाट यांनी सांगीतले. त्यामुळे ग्रामस्थांनी 26 जानेवारीपासून उपोषणाला बसू नये अशी विनंती केली. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के, मंडलाधिकारी श्रीमती सोनवणे, तलाठी संजय सोनवणे, सरपंच मनिषा गायकवाड, माजी सभापती अभिमन पाटील, मगन पाटील, ग्रामविकास अधिकारी ए.जे.पाटील आदि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान तहसीलदार शितल सोलाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के याच्यासह ग्रामस्थांनी गिरणा नदि पात्राची पाहणी केली. तेथे ज्या ठीकाणी रस्ता आहे तेथे खड्डा करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले.

….तर पुन्हा आंदोलन 

महसुल प्रशासनाने वडजी येथील तुर्तास वाळूचोरी थांबविली. त्यामुळे आम्ही 26 जानेवारी पासूनचे उपोषण  स्थगित करत आहोत. मात्र पुन्हा वाळूचोरी झाल्यास आंदोलन करू असे ग्रामस्थांच्या वतीने सुधाकर पाटील यांनी . गिरणा नदिवर  आमच्या गावाची शेती पर्यायाने अर्थकारण अवलंबून आहे. अशीच वाळूचोरी सुरू राहील्यास पाण्याचे संकट उभे राहू शकते. त्यामुळे ग्रामस्थांचा वाळूचोरीला विरोध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.