भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
डंपरने म्हशींना धडक देणारा व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारीस चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या “त्या” डंपर चालक विरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी संबंधित चालक विरुद्ध गुन्हा दाखल करत फिर्यादी व संशयित आरोपी यांच्यात आपसात तडजोड झाल्या नंतर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो हे दाखवून दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भडगाव- वाक रस्त्यादरम्यान डंपरने धडक दिल्याने तीन म्हशी ठार तर एक म्हशीला गंभीर दुखापत झाली आहे. धडकेची तीव्रता मोठी होती. गंभीर घटना घडलेली असताना त्यावेळी घटनेबाबत डंपर चालक व मालक विरुद्ध गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. मात्र पशुपालक व चालक – मालक यांच्यात आपसात तडजोड झाल्याचे कारण देत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. परंतु चौकशी करण्याचे कारण देत डंपर मात्र पोलीसांनी ताब्यात घेतला होता. यावेळी पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी पांडुरंग पवार हे रजेवर होते. ही घटना होऊन तीन दिवस उलटत नाही, तोच त्या चालकाने पुन्हा पेठ चौफुलीवर विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारीस चिरडण्याचा प्रयत्न केला. विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी नाना हाडपे हे आपल्या मोटरसायकलने शेतात जात असताना समोरून येणाऱ्या टोयोटा एन्हीवा क्रीसटा या चारचाकी गाडीने विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी नाना हडपे यांना पेठ चौफुलीवर जोरदार धडक दिली.
यात पदाधिकारीस पायास व हातास गंभीर मार लागुन दुखापत झाली होती. या दोन गंभीर घटना घडल्या असताना देखील “त्या” चालक व मालक विरुद्ध गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या गैरहजेरीत हा प्रकार घडला होता. ते पोलिस स्टेशनला हजर होताच त्यांनी दोन्ही घटनेचे गांभीर्य ओळखून उशिरा का असेना अखेर “त्या” चालक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात पोलीस स्टेशनला कार्यरत पो. काॅ. प्रविण परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर क्रमांक एम. एच. ४३ बीपी ७८४२ वरील चालक योगेश गोकुळ पाटील या. वाक ता. भडगाव हा दिनांक ११ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पीएसआय सुशिल सोनवणे, पोहेका निलेश ब्राह्मणकर, मनोहर पाटील हे पेट्रोलीग करीत असताना आरोपीने ताब्यातील डंपर भरधाव वेगाने चालवित असताना मिळुन आल्याने गुरन १५/२०२५ प्रमाणे भारतीय न्याय संहिता २८१, मोटर व्हॅकल अॅक्ट १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.