साई माऊली इंटरनॅशनल स्कूलमध्ये विधवांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव शहरात प्रथमच विधवा महिलांसाठी हळदीकुंकू घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती संगीता विजयकुमार अहिरे प्रिन्सिपल साई माऊली इंटरनॅशनल स्कूल यांनी केले. आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्व विधवा महिलांनी त्यात भाग घेऊन मनापासून मनमोकळ्या पणाने आनंद घेतला. सगळ्यांची स्वप्न सगळे पूर्ण करतात पण विधवा महिलांच्या भावना त्यांचे विचार ते मनात न दडपता, विधवा होणे तिच्या हातात नाही.  त्यात तिचा काय गुन्हा एकतर तिचा जोडीदार गेलेला असतो त्यात समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, प्रत्येक संकटाला स्वतः सामोरे जावे लागते, पण लोक काय म्हणतील या विचाराने आयुष्यभर स्वतःशी संघर्ष करत असते. सगळ्यांच्या भावना ती जपते पण स्वतः मात्र मागेच राहते.

पुरुषाला बायको मेल्यावर त्याचे कोणतेच हक्क काढून घेतले जात नाही.  पण स्त्रीला विधवा झाल्यावर कुंकू लावणे, जोडवे – मंगळसूत्र घालणे,ओटी भरणे अशा अनेक गोष्टी तिच्यापासून काढून घेतल्या जातात. पण नव्याने सुरुवात आपल्यापासून का नाही या विचाराने सर्वांना प्रेरित करून सर्व महिलांनी पहिल्यांदा कुंकू वान देउन सन्मानित करून नंतर जेवण दिले.  बऱ्याच जणांच्या डोळ्यातून फक्त पाणी वाहत होतं.  अनेक महिलांनी मनसोक्त मन मोकळं केलं . काहीच्या भावनांना  आवर घालणं अवघड होतं. जे झालं ते विसरू शकत नाही ती जागाही कोणी भरून काढू शकत नाही पण एकमेकांच्या सहाय्यातून एकमेकांना मदत करून एकमेकाची हितचिंतक बनवून, ताकद म्हणून काही प्रसंग आला तरी ती आपल्या भावना सांगून एकजूट होऊन तिला मदत करणार असे सर्वानुमते ठरले.

एक ग्रुप श्रीमती म्हणून तयार केला. कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांना मदत करतील या विचाराने नियोजन झाले.  नातेवाईक लांब असतात पण हक्काच व्यासपीठ मैत्री ही नातं असं असतं. सर्व भावना मनमोकळेपणाने सांगितले जातात. म्हणून तर काय महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन जिथे फक्त 100 महिलांचे नियोजन होतं. अक्षरशः तीनशे महिला स्वतः उपस्थित राहिल्याने खूप आनंद वाटला. दुखी चेहरे जेव्हा आनंदी झाली कोणीतरी आपला हक्काचा आहे अशी भावना त्यांच्या चेहऱ्यातून ओसडुंन वाहत होती.

जिथे संतांनी यज्ञाला  श्री श्री 10008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी विधवा महिलांना यज्ञ करण्यास अनुमती दिली.  यज्ञ म्हणजे परमेश्वराला जेवण घालणं होय. तर कुंकू लावण्यास काही हरकत नाही . सर्व महिलांचा आत्मविश्वास वाढला सर्वांचे कुंकू लावलेले चेहरे आनंदी चेहरे डोळ्यासमोर दिसत होते.  या कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर सौ. संगीता देवरे, श्रीमती. अनुपमा देशमुख, बालविकास अधिकारी शितल पाटील,  माऊली फाउंडेशनच्या सर्वेसर्वा श्रीमती गुताई सूर्यवंशी, नगरसेविका योजना पाटील उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली महाजन व रिंकू पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी चैताली पवार, मनीषा पाटील,  कविता सोनवणे,  लहान खेडगाव,  साई माऊली स्कूलची टीम यांनी मेहनत घेतली. अनमोल असे सहकार्य साई माऊली स्कूलचे पालक व चेअरमन विजय वामनराव देवरे यांचे लाभले. चंदाताई यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.