भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव शहर व पाचोरा येथे अवैध वाळू वाहतुकीच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. तसेच रात्रीच्या गाढ झोपेत ट्रॅक्टर आणि डंपरांच्या कर्कश आवाजाने अनेक नागरिकांच्या झोपा उडतात. त्यामूळे प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या आदेशाने महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या झोपा उडवल्या आहेत.
पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे अवैध वाळूचे तब्बल सहा ट्रॅक्टरांवर महसुळ विभागाने दि .11 रोजी रात्री 12 वाजता कारवाई करत ताब्यात घेण्यात आले असून पाचोरा तहसील कार्यालया येथे जमा करण्यात आले आहे. तसेच भडगाव शहर व तालुक्यातून अवैध वाळू उपसा हा अती प्रमाणात सुरु असताना भडगाव महसूल विभागाच्या पथकांनी तालुक्यांतील गिरड येथून अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर जप्त केले असुन या बाबत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
गिरड येथील कारवाई भडगाव तहसिलदार शितल सोलाट , तलाठी हलकारे, प्रशांत कुंभारे, तलाठी वारे, महादू कोळी, चालक लोकेश वाघ यांनी केली. पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे पाचोरा निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत, मंडळ अधिकारी आर.डी. पाटील, ग्राम महसूल अधिकारी नदीम शेख कुरंगी, राहुल पवार भडगाव, आशिष काकडे जारगाव, दिपक दवंगे लासगाव , अविनाश जंजाळे भडगाव, सुनील राजपूत , अतुल देवरे, अतुल पाटील, तलाठी अमोल शिंदे, प्रदिप काळे, तेजस बऱ्हाटे, योगेश व्यास, अजमल शाह यांनी केली असून जप्त सर्व वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.