eibe vergiftung ziege his and her gifts argos westchase pizza coupon cave of the winds lantern tour coupon
Monday, December 5, 2022

भडगाव येथे घरासह शेडला आग, संसारोपयोगी वस्तु व बकरी जळून खाक

- Advertisement -

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क              

- Advertisement -

शहरातील यशवंत नगर येथील रहिवासी हुसैन मन्यार यांच्या घराबाहेरील लाकडाच्या शेडला आज १ नोव्हेंबर रोजी दुपारी अचानक आग लागली. या आगीत एक  बकरी,धान्य, विक्रीच्या बांगड्या, कपडे, दुचाकी  व अन्य संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

दुपारी घराला आग लागली तेव्हा शेजारील नागरिकांनी येथे धाव घेतली. मोठ्या मेहनतीने नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले.  दरम्यान भडगाव अग्नीशमक विभागाचे एक बंब दाखल झाला. त्यांच्या मेहनतीने पूर्ण आग विझवण्यास मदत झाली.

यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी टोनगाव तलाठी राहुल पवार, पोलीस पाटील भूषण पाटील, कोतवाल किरन मोरे,  कैलास भोई, सामाजिक कार्यकर्ते संतोष महाजन आदींनी भेट देऊन पंचनामा केला.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या