भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील गिरणा नदीच्या पुलाजवळील बुरुजाजवळ अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन रोज राञी ९ वाजता करण्यात आले आहे. नवनाथ पोथी पारायणाचे आयोजन दि. ७ रोजी शनिवार ते दि. १४ रोजी पर्यंत दरवर्षाप्रमाणे याहीवर्षी करण्यात आले आहे. या सप्ताहाचे आयोजन नवनाथ मिञ मंडळ, भक्त परीवार व मिञ परीवारामार्फत करण्यात आलेले आहे.
यात दि. ७ रोजी शनिवारी हभप. रविंद्र महाराज तारखेडे तसेच दि. ८ रोजी रविवारी भागवताचार्य हभप. वामन महाराज लामकानीकर, दि. ९ रोजी सोमवारी ह.भ.प. विशाल देशमुख महाराज म्हसावद, दि. १० रोजी मंगळवारी युवा किर्तनकार ह.भ.प. ओंकार महाराज बाबरकर, दि. ११ रोजी बुधवारी ह.भ.प. योगेश महाराज चिंचोली, दि. १२ रोजी बुधवारी भागवताचार्य ह.भ.प. योगेश महाराज धामणगाव , दि. १३ रोजी भागवताचार्य ह.भ.प. ॲड राजश्री नगरकर, दि. १४ रोजी शनिवारी सकाळी ९ वाजता हभप. यांचे काल्याचे किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
सकाळी ११ वाजता दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. दि. १३ रोजी शुक्रवारी दुपारी १२ वाजता पालखी मिरवणुक श्री. नवनाथ महाराज मंदीर पासुन निघणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन भडगाव येथील श्री. नवनाथ महाराज मिञ मंडळ, भक्त परीवार, मिञ परीवारामार्फत करण्यात आले आहे.