भडगावात उद्या श्री. शन्नैश्वर महाराज याञोत्सव

0

भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

येथे गिरणा नदीच्या निसर्गरम्य काठावर श्री. शनि महाराजांचे मंदिर आहे. या मंदिरावर शनिआमावस्येसह वर्षभर भाविक दर्शन घेतात. या मंदिरावर भाविकांची मोठी गर्दी नेहमी दिसते. दरवर्षाप्रमाणे यावर्षीही दि. ३० रोजी शनिवारी श्री. शन्नैश्वर महाराजांचा याञोत्सव भरविण्यात येणार आहे. या याञोत्सवाला परीसरातील भाविकांची मोठया प्रमाणात असते.

 

याञोत्सवात कटलरी दुकाने, मिठाई दुकाने, पाळणे यासह विविध मनोरंजन व खेळण्यांचे  दुकानांचा याञेत समावेश असतो. या याञोत्सवाचे आयोजन श्री. शन्नैश्वर पंच मंडळामार्फत करण्यात येते. या आयोजीत  याञोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच दि. २ डिसेंबर रोजी सोमवारी राञी ७.३० वाजता ह.भ.प. श्री. पुरुषोत्तम महाराज बुलढाणा यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा, याञोत्सवाचा, किर्तनाचा लाभ घ्यावा. असे आव्हान आयोजक श्री. शन्नैश्वर पंच मंडळामार्फत करण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.