श्रीक्षेञ मांडकी देवस्थानात शनिवार रोजी भंडाऱ्यांचा कार्यक्रम

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

तालुक्यातील श्रीक्षेञ मांडकी येथील श्री. संत बाळु मामा देवस्थानावर दि. ३० रोजी शनिवारी अमावस्यानिमित्त भंडाऱ्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्त यादिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यात सकाळी ५ वाजता श्रींचे पाद्दयपुजन, सकाळी ७ वाजता आरती, संध्याकाळी ७ वाजता महाआरती याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम  होणार आहे. यावेळी अन्नदानाची सेवा सुरेश प्रल्हाद सोनार अडावद हल्ली मुक्काम पाचोरा हे स्वखर्चातुन देणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीक्षेञ मांडकी येथील सेवेकरी मंडळींमार्फत करण्यात आलेले आहे.

तरी या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा. असे आव्हान या देवस्थानाचे पुजारी हभप. सुभाष धनराज चौधरी यांचेसह सेवेकरी मंडळी आदिंमार्फत करण्यात आले आहे. हे श्री. संत बाळु मामांचे भव्य मंदिर गिरणा काठावर निसर्गरम्य वातावरणात गावकऱ्यांमार्फत बांधण्यात आलेले आहे. या मंदिरात वर्षभर याञोत्सव,

शनिअमावस्या यासह विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. भाविक दर्शनासह कार्यक्रमांचा वर्षभर लाभ घेत असतात. या मंदिरावर दररोज आरती होते. भाविकांची मोठया संख्येने उपस्थिती असते.

Leave A Reply

Your email address will not be published.