भडगावात अवैध वाळू वाहतुकीवर महसुलचा धडाका सुरूच

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव शहरासह तालुक्यात गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरु आहे. यावर भडगाव महसूल विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी गेल्या दोन दिवसापूर्वी मोठी कारवाई करत वाहने जप्त केली होती.

यातच महसूल विभागाने काल रात्री मौजे टोंनगाव येथुन एक ट्रॅक्टर तर मौजे वाक येथुन अवैध वाळू भरलेले आहेत. एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.  सदर दोन्हीही ट्रॅक्टर भडगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.  यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल विभागाने दिली आहे.

या दोन्ही कारवाई पथकात ग्राम महसूल अधिकारी  संजय सोनवणे, लोकेश महाजन, विजय पाटील, कोतवाल समाधान माळी, तलाठी हलकारे, विलास शिंदे यांच्या पथकाने कारवाई केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.