भडगाव महसुलची वॉश आऊट मोहीम
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले, एकाच रात्रीत तीन डंपर व एक ट्रॅक्टर जप्त
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव शहर व तालुक्यातून अवैध वाळू उपसा हा अती प्रमाणात सुरु आहेत. भडगाव महसूल विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी शहरातील तालुक्यांतील गिरड, पळासखेडे या ठिकाणाहून अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर व एक ट्रॅक्टर जप्त केले आहे. यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
भडगाव तालुका हा गिरणा नदीवर अवलंबून आहे. शेती असो की पिण्याच्या पाण्याची तहान ही गिरणा नदी भागवते. यातच अवैध वाळू हि भरपूर प्रमाणात अवैधरित्या उचलली जात असुन या अवैध वाळूवर हातोडा म्हणुन सदर कारवाईचे नियोजन अगदी गोपनीय पद्धतीने करण्यात् आले होते. कारवाईसाठी 3 वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते. भडगाव महसूल विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी तालुक्यातून तीन डंपर व एक ट्रॅक्टर जमा केले असुन ते वाहने भडगाव तहसील आवार व शासकिय आय.टी.आय. या ठिकाणी गृह आवारात लावण्यात आले आहेत.
यात एक डंपर विना नंबरचे पिवळ्या रंगाचे भारत बेंझ कंपनीचे शरद पाटील रा.भडगाव पेठ यांच्या मालकीचे आहे. दुसरे डंपर अशोक लेलँड कंपनीचे असून सागर महाजन राहणार पाचोरा एम् . एच 12 के . पी 3856 या क्रमांकाचेचे आहे. तिसरे डंपर अशोक लेलंड कंपनीचे असून अजय सुरवाडे यांच्या मालकीचे आहे. तसेच एक ट्रॅक्टर सोमनाथ पाटील रा.देवगाव पारोळा यांचे मालकीचे असून विना नंबरचे आहे.
यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दैनिक लोकशाहीशी बोलताना दिली. ही कारवाई प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसिलदार शितल सोलाट यांच्या आदेशानुसार विभागाचे मंडळ अधिकारी आर. डी. पाटील, पाचोरा, मंडळ अधिकारी दिनेश येडे, ग्राम महसूल अधिकारी गिरड -टोणगाव राहुल पवार, तलाठी प्रशांत कुंभारे, पाशा हलकारे, योगेश पाटील,आशिष काकडे, सुनील मांडोळे, महादू कोळी विलास शिंदे, लोकेश् वाघ वाहन चालक आदींनी वेगवेगळ्या कारवाई केली. या बाबत पुढेही अशीच करवाई सुरु राहणार असल्याचे यावेळी सांगीतले.