भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील एका गावातील 65 वर्षीय मूकबधिर महिला आपल्या अंगणात खाटीवर झोपली असताना गावातील 27 वर्षीय तरुणाने मध्यरात्री या मूकबधिर महिलेवर अत्याचार करून पळ काढला. याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गंभीर गुन्ह्यात फरार झालेला आरोपीला एका तासाच्या आत भडगाव पोलीसांनी अटक केली आहे.
भडगाव तालुक्यातील एका गावात दि.15 रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमरास 65 वर्षीय मूकबधिर महिला तिच्या अंगणात झोपली असताना गावातील 27 वर्षीय तरूणाने अत्याचार करून रक्तबंबाळ केले. या वेळी महीलेले आरडाओरड केली तेव्हा नातेवाईक जागे झाले तोपर्यंत आरोपी घटना स्थळावरून पसार झाला होता. या घटनेची माहिती भडगाव पोलिसांना मिळताच भडगाव पोलिस स्टेशनचे पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के, पो. हे. कॉ. संजय पाटील, निलेश ब्राम्हणकर, प्रविन परदेशी, चालक संभाजी पाटील यांनी आरोपीला एका तासाच्या आत अटक केली.
या बाबत 27 वर्षीय तरुणाविरुध्द भडगाव पोलिस स्टेशनला गु.र.न. ४२४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३३३,६४(१),६४ (२). (k), (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के हे करीत आहे.