भडगावात नरवीर जिवाजी महाले यांची जयंती साजरा

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक, नरविर जिवाजी महाले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेंद्र सोनवणे होते तर होळनाथे येथील चिंधु निकम व नाचणखेडे येथील ज्ञानेश्वर ठाकरे याची विशेष उपस्थिती होती.

समाज मंदिरात आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पुजन चिंधु निकम, ज्ञानेश्वर ठाकरे, राजेंद्र सोनवणेसह अध्यक्ष संजय पवार व उपाध्यक्ष रविंद्र शिरसाठ सह सर्व उपस्थित समाज बांधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष यांनी जिवाजी महाले यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी झालेली भेट, सैन्यातील सहभाग, जिवाजी महाले यांची स्वामीनिष्ठा ते प्रतापगडावरील शिवाजी महाराज व जिवाजी महाले यांचे अद्वितीय शौर्य याबाबत सविस्तर माहिती आपल्या मनोगतातून दिली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष रविंद्र शिरसाठ, खजिनदार दिपक शिरसाठ, कार्यकारणी सदस्य सुभाष ठाकरे, संपर्क प्रमुख भरत चव्हाण, भगवान नेरपगार, नामदेव चव्हाण, विनोद शिरसाठ, सुभाष ठाकरे, किशोर निकम, राकेश शिरसाठ, राजेंद्र सोनवणे, हिलाल नेरपगार, शिवाजी शिरसाठ, सिताराम महाजन चिंधु निकम होळनाथे, ज्ञानेश्वर ठाकरे नाचणखेडेसह नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.