जगतगुरु जनार्दन स्वामी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा संपन्न

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र गोंडगाव येथील आश्रमात संत जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या ३३ वे  पुण्यस्मरण निमित्त होत असलेला राष्ट्र निर्माण धर्म सोहळा दि. २८ /११/२०२२ ते ५ /१२/२०२२  डिसेंबर  या पर्वकाला मध्ये संपन्न होणार आहे. त्या सोहळ्याचा ध्वजारोहण कार्यक्रम उत्तराधिकारी श्री श्री १००८  महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज यांच्या शुभहस्ते गोंडगाव येथे बाबाजींच्या आश्रमात  करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  तसेच  १२ सजविलेल्या बैलगाडयांवर आकर्षक सजीव देखावे व सजविलेल्या घोडयावर शिवाजी महाराज यांची वेषभुषा शिवव्याख्याते दत्ताञय श्रावण मांडोळे यांनी साकारली. तर घोडयावर स्वार झाशीची राणी यांची वेषभुषा कोमल नेहरु पाटील या मुलीने साकार केली. यावेळी महीलांनी घरोघरी औक्षण केले.  सर्व आकर्षक सजीव देखावे गावातुन निघालेल्या शोभायाञा मिरवणुक  खास आकर्षण ठरले.

यावेळी शोभायाञेत एका  सजविलेल्या बैलगाडयावर  श्री. शांतीगीरी महाराज व रामानंद जी महाराज सोबत पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे ही सहभागी होते. यावेळी शोभायाञा मिरवणुकीत पाचोरा भाजपाचे अध्यक्ष अमोल शिंदे, डाॅ. भुषण मगर, माजी नगरसेविका योजना पाटील, मेडीकल असोशिएशन अध्यक्ष सुरेश भंडारी यांचेसह नागरीक, महिला मोठया संख्येने सहभागी होते. यावेळी भक्तीमय गितांनी परीसर भक्तीमय वातावरण झाल्याचे दिसुन आले. ओम जनार्दनाय नमा, ओम जनार्दनय नमा अशा बाबाजींच्या नावाने घोषणाही देण्यात आला.

उपस्थित राष्ट्र निर्माण धर्म  सोहळा मुख्य समिती व चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील, पाचोरा           भाजपा अध्यक्ष अमोल शिंदे, पाचोरा डॉक्टर भूषण मगर, भडगाव माजी नगरसेविका  योजना पाटील, मेडीकल अॅसोसीएशनचे अध्यक्ष सुरेश भंडारी, अशोक परदेशी, लिलावती फाउंडेशनचे अध्यक्ष डॅा. प्रमोद पाटील, जय बाबाजी भक्त परिवाराचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा संपर्क सेवक अमरसिंग पाटील, जिल्हा सेवक अजय पाटील राष्ट्र निर्माण धर्म सोहळा समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश अहिरे, उपाध्यक्ष माजी सैनिक समाधान पाटील आदिंच्या शुभहस्ते ध्वजपुजन व ध्वजारोहण करण्यात आले.

१२ सजविलेल्या बैलगाडयांवर सजीव देखावे याप्रमाणे होते. यात अनुष्ठान, यज्ञ, नंदादीप, सार्थ एकनाथी भागवत, हस्तलिखीत जप, साधना संकीर्तन जप यासह विविध देखावे साखारले होते. हे सर्व देखावे शोभायाञेत आकर्षण ठरले.  व सर्व तालुका सेवक दगडू गुरुजी नाना काटे, संभाजी भदाने, धरणगाव, नंदु शिंदे , भरत महाजन एरंडोल, पांडुरंग बनकर, दिलीप परदेशी सोयगाव, रवींद्र पाटील, प्रकाश चौधरी, पिंटू चौधरी पारोळा, उत्तम बोरसे, माधवराव सोनवणे, नारायण कुमावत, संदेश कुमावत चाळीसगाव, दिलीप पवार, बिहारी पाटील, राजेंन्द्र पाटील, शिवराज पाटील पाचोरा, कैलास महाजन, शंकर पाटील अमळनेर, अशोक पाटील, दिपक पाटील, बद्रीनाथ पाटील, साहेबराव पाटील भडगांव, डॅा. परदेशी, विशंबर शिसोदे जामनेर, प्रकाश पाटील, अजय गडे यावल, गोंडगाव गावातील स्थायी समिती अशोक पाटील, रामचंद्र पाटील, अरुण  थोरात, भागवत पाटील, बारकू पाटील, नामदेव सोनार, धर्मराज पाटील, सूर्यकांत पाटील, गणेश वाणी, सुनील पाटील,पांडुरंग पाटील, विजय ठाकूर, हरी पाटील, राजु पाटील, पि के मोरे, सुनिल पोतदार, बांबरुड प्र ब येथील भिकन दयाराम पाटील, दारासिंग चिंधा पाटील, मुरलीधर पाटील, भिमराव कोळी ,पिंन्टु पाटील, विजय पाटील, सतीष पाटील, मुरलीधर पाटील, विजय साळुंखे, दत्तु मांडोळे, सुनिल टेलर, नाना चौधरी, गोंडगाव लोकनियुक्त सरपंच शिवाजी पाटील, राहुल  पाटील, राहुल नेहरू पाटील, हरीश पाटील, रतिलाल पाटील, कन्हैय्या ठाकुर, विनायक पाटील, संजय मांडोळे, राहुल सोनार, अरुण वाणी,  व गोंडगाव मधील जयबाबाजी परिवार व  ग्रामस्थ, परिसरातील जय बाबाजी भक्त परिवार आनंद उत्सवात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यासाठी स्वरांजली ग्रुपमध्ये कन्हैया ठाकूर वेरुळ येथील संकेत पाटील, हनुमान खेडे येथील विकास पाटील व सर्व टीम यांनी बाबांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सुञसंचलन जेष्ठ गुरु बंधु शिवा अंगुरगावकर यांनी केले. तर आभार पि.के.मोरे यांनी मानले. या सोहळा कार्यक्रमास जळगाव, धुळे जिल्हा, गोंडगाव परीसरातील बाबाजी परीवाराचे भाविक, महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. बाबाजींचा ३३ वा पुण्यस्मरण सोहळा हा खान्देशात घेण्यात यावा.

दुनियामे बहोत संत है मगर बाबाजी जैसे नही 

तसेच यावेळी व्यासपिठावर श्री. शांतीगीरीजी महाराज, पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश पाटील, पाचोरा भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, डाॅ. भुषण मगर, दत्ताञय मांडोळे यांचेसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री. शांतीगीरीजी महाराजांनी ओम जनार्दना नमा, श्री. काशीविश्वेश्वराय नमा आदि जय नामाचा जयघोष करीत भक्तीगीतेही  सत्संगातुन सादर केली. प्रवचनात बोलतांना श्री. शांतीगीरीजी महाराज म्हणाले कि, बगीचे मे फुल है तो गुलाब जैसा नही. मगर दुनियामे बहोत संत है बाबाजी जैसे नही. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे राष्टृहीत जोपासत, हिंदु संस्कृतीची पताका फडकवुन हिंदु धर्माचे रक्षण त्यांनी केले. असे मोदीजींचे अनमोल कार्य आहे. याचा आदर्श राजकीय मंडळींनी घ्यावा. असे आवाहनही श्री. शांतीगीरीजी महाराज यांनी केले.बाबांजींनाही वाटले नव्हते कि अयोध्येत श्रीराम मंदीराची उभारणी केली जाईल. माञ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत श्रीराम मंदीराची उभारणी केली. त्यांचे आभार मानले. या मंदीराला जय बाबाजी भक्त परीवारामार्फतही देणगी देण्यात आली होती असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.