भडगाव येथे भाजप तर्फे काॅग्रेस खा.धीरज साहु यांचा जाहीर निषेध

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

काॅग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्याकडे बेहिशोबी ३०० कोटी पेक्षा जास्त रोकड आयकर विभागाच्या पथकाने जप्त केल्या प्रकरणी या खासदाराचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजप जिल्हा उपाध्यक्षा नुतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली व भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर धिक्कार व निषेध व्यक्त करत जोडे मार आंदोलन करण्यात आले.
दि ११ डिसेंबर सकाळी ९:३० वाजता. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, पाचोरा चौफुली येथे आंदोलन भाजपच्या वतीने काॅग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्याकडे बेहिशोबी रोकड जप्त प्रकरणी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी या खासदाराच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्या. यावेळी महीला आघाडीच्या नीता गुरव, मनीषा पाटील, सुवर्णा पाटील, पल्लवी अहिरराव, भाजप शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किरण शिंपी, सरचिटणीस प्रदिप सोमवंशी, मनोज पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष विशाल चौधरी, प्रदीप कोळी, नामदेव मालचे, सुभाष मोरे, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष विजय आलई, युवराज पाटील, नरेंद्र पाटील, मुन्ना परदेशी, सूर्यभान वाघ, कुणाल पाटील, निखिल कासार, अनिल महाजन सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.