भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर व ट्रॅक्टर भडगाव महसूल विभागाच्या पथकाने काल रात्री पकडले असून दोन्हीं वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. भडगाव शहरातील राजाराम बापू मेगासिटी येथे अवैधरित्या गौण खनिज वाळूवाहतूक करतांना डंपर क्र.एम एच 17 बी.वाय 3129 व सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर असे एकूण 2 वाहन महसूल पथकाने पकडले. या पथकात तलाठी आर.डी.पाटील, तलाठी राहुल पवार, तलाठी अविनाश जंजाळे, तलाठी आशिष काकडे, मंडळ अधिकारी भरत ननवरे यांच्या पथकाने कारवाई केली असून या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.