Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणुकीपासून सावध राहा!
    जळगाव

    डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणुकीपासून सावध राहा!

    जळगाव पोलिसांचे ज्येष्ठांना आवाहन : जिल्ह्यात प्रथमच राबविला अभिनव उपक्रम
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 3, 2026No Comments122 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षितता व कल्याणासाठी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत आज एसपी कार्यालयात एक विशेष संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाचा अभिनव उपक्रम राबवण्यात आल्याने, उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले.

    या बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षकांनी ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांची सुरक्षा, मालमत्तेचे वाद, कौटुंबिक समस्या, आरोग्याची आपत्कालीन परिस्थिती आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांतर्फे विशेष मार्गदर्शन करण्यात आले. बँक अधिकारी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून होणारी फसवणूक, केवायसी अपडेट, ओटीपी  आणि क्यूआर कोडद्वारे होणारी फसवणूक, तसेच ‘डिजिटल अरेस्ट’ आणि बनावट गुंतवणूक योजना यांसारख्या ऑनलाइन गैरप्रकारांची माहिती देऊन ज्येष्ठांना जागृत करण्यात आले. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक व बँकेची माहिती शेअर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले.

    याशिवाय घरफोडी, चोरी व मालमत्तेची फसवणूक टाळण्यासाठी घरगुती मदतनीस किंवा केअरटेकरची योग्य पोलीस पडताळणी करणे किती महत्त्वाचे आहे, हे समजावून सांगण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पोलीस आणि शेजाऱ्यांशी संपर्क ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला. ”ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे आधारस्तंभ असून त्यांची सुरक्षा व सन्मान ही जळगाव पोलिसांची प्राथमिकता आहे,” अशी ग्वाही पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिली. या थेट संवादामुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांच्या या लोकाभिमुख आणि संवेदनशीलता जपणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif