अननस खूपच आरोग्यदायी; ‘हे’ फायदे तुम्हाला माहितीय का ?

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आपले चांगले आरोग्य आपल्या योग्य आहारावर अवलंबून असते. आहारात पूरक जीवनसत्वे असले पाहिजे. आपल्या आहारात फळे देखील महत्वपूर्ण भूमिका बजावतात. तसेच वजन कमी करण्यासाठी आहारात फळांचा अधिक समावेश करावा. फळांमध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे चयापचय सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

इतर फळांप्रमाणे अननसाचे देखील आश्चर्यकारक फायदे (Benefits of pineapple) आहेत. अननस तुमचे त्वजा तजेलदार करतं, सुंदर बनवतं, एवढंच नाही तुमची पचन क्षमता सुधारतं, व्हिटामीन सी हिरड्यांना निरोगी ठेवतेचला तर मग जाणून घेवूया अधिक माहिती..

अननसाचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. तसेच यामुळे वजन कमी होईल आणि हाडे मजबूत होतील. अननसात कॅलरी कमी आणि कार्बोहायड्रेट कमी असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. अननसमध्ये उच्च ब्रोमेलेन फायबर आढळते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि भूक नियंत्रित राहते.

अननस खाल्ल्याने शरीरातील लेप्टिन हार्मोन कमी होतो. या हार्मोनद्वारे शरीरातील वजन नियंत्रित करता येते. अननसमधील विटामीन सी स्कीन इलास्टिसिटी वाढवते आणि सुंदर बनवते. अननसमधील ब्रोमेलीन एंजाईम डायझेशन सुधारतात. अननसमधील व्हिटॅमिन सी हिरड्यांना निरोगी ठेवते. अननस संधीवात सारख्या आजाराच्या वेदना कमी करते.

अननसमधील पोटॅशियम ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचे काम करते. अननसमधील अॅटीऑक्सिंडेन्ट कॅन्सरची शक्यता कमी करते आणि सेल्स हेल्दी ठेवतात. सर्दी खोकल्याची शक्यता कमी करते, आणि कफ दूर करण्यासाही ते फायदेशीर आहे. अननसमधील मॅग्निज हाडे आणि कनेक्टिंग टिश्यूज कमी करतात.

अननसाचा ज्यूस, गळ्यातील खरखर कमी करते, सायनसमध्ये त्याचा फायदा होतो. अननसमधील अँटीऑक्सिडन्ट आणि विटामीन सी डोळ्यावर होणार वयाचा परिणाम कमी करतं.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.