बहुगुणी आवळा ! जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

लोकशाही न्यूज नेटवर्क

बाजारात सहज मिळणारा टमाट्याच्या आकाराचा आवळा हे फळ अनेकांच्या आवडीचं फळ आहे. आयुर्वेदामध्ये आवळ्याचे महत्व सांगण्यात आले आहे. साधारण हिवाळ्यात येणारे हे फळ आहे. साधारणपणे लागवडीपासून दोन महिन्यात आवळ्याचं फळ हे रसाळ आणि परिपक्व होत. या फळामध्ये शक्तिवर्धक रसायनाचा समावेश असतो.

आधुनिक रासायनिक विश्लेषकांच्या दृष्टिकोनातून पहिले तर आवळ्यात जितके व्हिटॅमिन सी आढळते तितके दुसऱ्या कुठल्याच फळात आढळत नाही. बेलफळाच्या दहा टक्के संत्र्यात आणि संत्र्याच्या दहा टक्य्यांपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आढळते. आवळा तुरट आणि लांबट असल्याने पित्त, कफ,जुलाब या आजारावर ते एक जालीम औषध आहे. त्यामुळेच आवळ्याला त्रिदोषनाशक ही म्हटले जाते.

आवळा हा म्हातारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचनक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केस काळेभोर करणारा असा अनेक विकारांवर गुणकारी आहे. आवळ्याच्या सेवनाने शरीरातील पांढऱ्या पेशींशी लढा देण्याची क्रिया जलद गतीने होते.

शिवाय शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी देखील आवळा अत्यंत गुणकारी आहे. डोळ्यांचं सौंदर्य जर राखायचं असेल तर आवळा नियमित खावा. आवळ्यातील पोषकत्वामुळे शरीरातील विषारी घटक सहज बाहेर फेकले जातात. आवळ्याची आंबट, तुरट चव सर्वांनाच आवडत असल्याने आवळ्यापासून कांडी, मुरंबा, आवळ्याची चटणी अशा पदार्थांचे आहारात सेवन केल्यास अनेक विकार बरे होतात.

ज्या लोकांना ऍसिडिटी किंवा अपचनाच्या समस्या असतील त्यांनी आवळ्याच्या चूर्णाचे सेवन केल्यास पोटातील जळजळ शांत होऊन अपचनाचा त्रास कमी होतो. असा हा आवळा म्हणजे एक उत्तम अशी गुनौषधी आहे.

संकलन
सुबोध रणशेवरे
संपर्क -९८३३१४६३५६

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here