डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात ‘खेळाडू गौरव सोहळा’ मोठ्या उत्साहात

0

डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात ‘खेळाडू गौरव सोहळा’ मोठ्या उत्साहात

जळगाव प्रतिनिधी ;– येथील डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) येथे ‘ दि.२२ एप्रिल २०२५ रोजी खेळाडू गौरव सोहळा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.गौरी राणे होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा संचालिका डॉ.अनिता कोल्हे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी जिमखाना विभागाची गौरवशाली परंपरा मांडली.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त्य) जळगाव चे क्रीडा संचालक डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर व श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती सॉफ्टबॉल खेळाडू कु.नेहा देशमुख उपस्थित होते.

आपल्या आवडीच्या खेळाकडे वळून त्यांनी सरावात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. तसेच जीवनातील प्रत्येक अपयश पचवण्याची क्षमता ज्यांच्या अंगी असेल तो कधीही स्पर्धेत अपयशी होत नाही.असे मत मांडून क्रीडा क्षेत्रातील करिअरची संधी यावर डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर यांनी विचार मांडले.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.