Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»खाली खवळलेला पुराचा रौद्र प्रवाह… वर फणा काढून बसलेले तीन नाग!
    जळगाव जिल्हा

    खाली खवळलेला पुराचा रौद्र प्रवाह… वर फणा काढून बसलेले तीन नाग!

    सात तास मृत्यूशी झुंज : धाडस अन्‌‍ नशिबाच्या जोरावर सुरेश भील यांची सुटका
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 2, 2026No Comments876 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    ‌‘काळ आला होता… पण वेळ आली नव्हती‌’ या म्हणीचा प्रत्यय धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथे आलेल्या एका थरारक घटनेत आला. मुसळधार पावसामुळे नदीला अचानक आलेल्या पुरात अडकलेल्या सुरेश भील यांनी तब्बल सात तास मृत्यूशी झुंज दिली. जीव वाचविण्यासाठी त्यांनी एका झाडावर आश्रय घेतला; मात्र त्याच झाडावर आधीपासून तीन विषारी नाग असल्याचे लक्षात येताच त्यांच्या संकटात आणखी भर पडली. खाली खवळलेला पुराचा वेग आणि वर फणा काढून बसलेले नाग अशा दुहेरी संकटाचा सामना करत त्यांनी अखेर धाडस, संयम आणि प्रसंगावधानाच्या जोरावर स्वतःचा जीव वाचविला.

    धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथील रहिवासी सुरेश भील हे नेहमीप्रमाणे नदीत मासेमारी करण्यासाठी गेले होते. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील ओढे-नाल्यांना पूर आला आणि काही वेळातच नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागली. सुरुवातीला परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वाटत असताना काही मिनिटांतच पुराचा प्रवाह इतका प्रचंड झाला की, किनाऱ्यावर परतण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला. वाढत्या पाण्यामुळे ते नदीच्या मध्यभागी अडकले. पाण्याचा वेग क्षणोक्षणी वाढत असल्याने वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने त्यांनी जीव मुठीत धरत नदीकाठी असलेल्या एका झाडावर चढण्याचा निर्णय घेतला. काही वेळासाठी तरी जीव वाचल्याचे समाधान वाटत असतानाच त्यांना समोरचे दृश्य पाहून धक्का बसला. ज्या झाडावर त्यांनी आश्रय घेतला होता, त्याच झाडाच्या फांद्यांवर तीन विषारी नाग वेटोळे घालून बसले होते.

    एकीकडे पायाखाली फेसाळत वेगाने वाहणारे पुराचे पाणी आणि दुसरीकडे काही फुटांवर फणा काढून बसलेले नाग… अशा अंगावर काटा आणणाऱ्या परिस्थितीत कोणाचाही धीर सुटला असता; मात्र सुरेश भील यांनी घाबरून कोणतीही चुकीची हालचाल केली नाही. त्यांनी शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण केले. तब्बल सात तास ते त्या झाडावरच थांबून राहिले. या काळात त्यांनी पाण्याची पातळी कमी होण्याची वाट पाहिली. दरम्यान, नागांचा धोका कायम असल्याने त्यांनी मोठ्या धाडसाने झाडाच्या काही फांद्या तोडल्या आणि त्यांचा उपयोग करून नागांना झाडावरून खाली पुराच्या पाण्यात लोटले. त्यानंतरही त्यांनी घाई न करता काही वेळ परिस्थितीचा अंदाज घेतला. पाण्याचा वेग काहीसा कमी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी योग्य संधी साधत नदी पार केली आणि सुखरूप बाहेर पडण्यात यश मिळविले.

    सुरेश भील पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिल्यानंतर यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तहसीलदारांसह महसूल विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्याची तयारी सुरू असतानाच भील यांनी स्वतःच्या धाडसाच्या जोरावर संकटातून मार्ग काढला. त्यानंतर प्रशासनाने त्यांची सुरक्षितता सुनिश्चित केली. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून, सुरेश भील यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुराच्या पाण्याशी झुंज देतानाच विषारी नागांचाही सामना करून त्यांनी दाखविलेले प्रसंगावधान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

    धाडसाने जिंकली मृत्यूशी लढाई

    पुराच्या पाण्याचा विळखा, झाडावरील विषारी नाग आणि तब्बल सात तासांचा जीवघेणा संघर्ष… या सर्व संकटांवर मात करत सुरेश भील यांनी मृत्यूच्या दाढेतून स्वतःची सुटका केली. त्यांच्या या थरारक अनुभवामुळे चावलखेडा परिसरात एकच चर्चा रंगली असून, ‌‘धीर, संयम आणि प्रसंगावधान असेल तर अशक्य वाटणाऱ्या संकटावरही मात करता येते,‌’ याची प्रचिती या घटनेतून आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026

    देवझिरी-देवगडच्या जंगलात अवैध गांजाची १७५ झाडे जप्त

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif