बापरे.. फैजपूरमध्ये ३५ किलो गोमांस जप्त; ३ जणांवर गुन्हा

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

दुचाकीवरून बेकायदेशीररित्या गोमांस विक्रीसाठी नेणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आल्याची घटना फैजपुर शहरात घडली असून ३५ किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फैजपूर शहराजवळील भुसावळ रोडवर असलेल्या पिंपरूळ फाट्याजवळून दोन जण गोमांस विकत घेवून जात असल्याची गोपनिय माहिती फैजूपर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांना मिळाली, त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्यात. पोलीस नाईक बाळू मराठे आणि पो.ना. अमजद खान अली शेरखान पठाण हे तातडीने कारवाईसाठी रवाना झाले.

१५ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच १९ बीके २७६) यावरून बेकायदेशीररित्या ३५ किलो गोमांस विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आले. याबाबत यांना परवानगीची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यात संशयित आरोपी शाकीर खान शाबीर खान (वय २७, रा. मित्तल नगर भुसावळ) आणि ताबिश खान आसिफ खान (वय २५, रा.मटण मार्केट जवळ भुसावळ) आणि विक्री करणारा शेख अशफाक शेख रहेमान रा. फैजपूर ता. यावल यांच्यावर कारवाई केली.

याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पो.ना. बाळू मराठे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. अमजद खान आली शेरखान पठाण हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here