महाराष्ट्र बँकेचे ATM फोडण्याचा प्रयत्न, चोरटे सीसीटीव्हीत कैद

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

बीड;  केज येथे कानडी रोडवरील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा दोन अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, एटीएममधील रक्कम चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या बाबतची माहिती अशी की, मंगळवारी (दि. २२ फेब्रुवारी) पहाटे ३:५१ वाजण्याच्या सुमारास केज जिल्हा बीड येथील कानडी रोड असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम दोन अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला.

यावेळी एटीएमचे लोखंडी शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. मात्र, चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोन अज्ञात चोरटे कैद झाले आहेत.

या प्रकाराची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. यानंतर पोलीस पथकाला पाचारण करून चोरट्याचा शोध लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.