नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी (13 ऑक्टोबर)
मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये क्रिकेट बोर्डाचा अध्यक्षपद निवडण्यासाठी बैठक झाली होती. या बैठकीवेळी अध्यक्षपदाच्या शर्यतीत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि एन श्रीनिवास हे गट आमने-सामने होते. श्रीनिवासन गटाकडून ब्रजेश पटेल तर ठाकूर गटाकडून प्रिन्स ऑफ कोलकाता सौरव गांगुली यांचे नाव सुचवले जात होते. अखेर काल झालेल्या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर सौरव गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह बीसीसीआय सचिव, तर अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुणसिंह ठाकूर यांच्या गळ्यात कोषाध्यक्षाची माळ पडू शकते.