जळगाव ;- तालुक्यातील चिंचोली येथे राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाने बाजारात जाऊन येतो असे सांगून निघून गेल्याचे घटना 17 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बेपत्ता चुलत सासऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की जितेंद्र राम सीताराम वय 40 राहणार मुजफ्फरनगर बिहार हल्ली मुक्काम मेडिकल कॉलेज चिंचोली तालुका जिल्हा जळगाव हे 17 रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घरात बाजार करून येतो असे सांगून कुठेतरी निघून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांचा शोध घेऊन सुद्धा ते मिळून आल्याने दिनेश मुलचंद्रा तीस हल्ली मुक्काम मेडिकल कॉलेज चिंचोली यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफुर तडवी करीत आहे..