Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»बत्ती गुल अन्‌ धानोरेकर कुल… कुल!
    जळगाव जिल्हा

    बत्ती गुल अन्‌ धानोरेकर कुल… कुल!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 23, 2026Updated:February 23, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    धानोरा, ता. चोपडा

    परिसरात सध्या अचानक भारनिमन करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरीक त्रस्त झालेले आहेत. वारंवार बत्ती गुल होत असतांना देखील धोनोरेकर मात्र कुल कुल (शांत) असल्याने कंपनीचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढतच आहे. कार्यकारी अभियंत्यांपासून ऑपरेटर, वायरमन कुणाचेही फोन घेत नसल्याने लार्इट येर्इल केव्हा हे कुणीही सांगत नसल्याने शेतीची नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. परिसरातील विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी हात वर केल्याने या गंभीर समस्येला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित रहात आहे.

    ‘लाईट कधी येणार?’ हा साधा प्रश्न सध्या धानोरा परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी कोडे ठरला आहे. अचानक होणाऱ्या भारनिमनामुळे गावोगावी अंधार पसरतो, पाण्याची मोटार थांबते, घरातील उपकरणे बंद पडतात आणि सर्व नियोजन कोलमडते. पण या सर्व गोंधळात वीज वितरण कंपनीचे अधिकारी मात्र ‘कुल. . . कुल’ शांत आहेत. परिणामी नागरिकांचा संताप दिवसेंदिवस उफाळून येत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून धानोरा व परिसरात कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात आहे. दिवस असो वा रात्र, शेतात पाणी देण्याची वेळ असो वा विद्यार्थ्यांची अभ्यासाची वेळ अचानक बत्ती गुल होते आणि तासन्‌तास वीज परत येत नाही. शेतीसाठी पाणी सोडायचे की नाही, हेच ठरवता येत नाही. रात्री दोन-दोन वाजेपर्यंत मोटारीजवळ थांबून राहावे लागते, अशी व्यथा शेतकऱ्यांची आहे.

    रब्बी हंगाम उंबरठ्यावर असताना वीजपुरवठ्यातील अनियमितता शेतकऱ्यांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरला आहे. ठराविक वेळेत पाणी न मिळाल्यास पिकांवर परिणाम होतो. केळी, कांदा, मका, भाजीपाला यासारख्या पिकांना नियमित पाणी आवश्यक असते. परंतु वीज नसल्याने मोटारी बंद राहतात आणि पिके तहानलेलीच राहतात. वीजेच्या लपंडावामुळे उपकरणांचे नुकसान होण्याची भीतीही वाढली आहे. मोटारी जळणे, स्टार्टर बिघडणे, डीपीवर ताण येणे असे प्रकार वाढत असल्याची तक्रारही होत आहे. शेतकरीच नव्हे, तर दुकानदार, छोटे व्यावसायिक, विद्यार्थी आणि गृहिणी यांनाही या समस्येचा फटका बसत आहे. दुध व्यवसाय, किराणा दुकाने, थंडगार पेये व आइस्क्रीम विक्रेते यांचे नुकसान होत आहे. ऑनलाईन व्यवहारांच्या काळात वीज नसल्याने इंटरनेट सेवा ठप्प होते. परिणामी व्यवहार अडकतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. बोर्डाच्या परीक्षा सुरु असून वारंवार होणाऱ्या अंधारामुळे अभ्यासात खंड पडत आहे.

    अधिकारी फोन घेर्इना अन्‌ लोकप्रतिनिधी झोपेत!

    वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांपासून ऑपरेटर व वायरमनपर्यंत कुणीही फोन घेत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वीज कधी येणार, दुरुस्तीचे काम सुरू आहे का, भारनिमन किती वेळ चालणार याची कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही. कार्यालयात गेल्यास वरून लार्इट बंद आहे असे उत्तर मिळते. परिसरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले असून नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे हाच प्रश्न आहे. जनतेच्या सेवेसाठी असलेले लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकी भिडली आहे.

    #dhanora #electricity Batti Gul Load shedding Mahavitaran officer public representative Wireman
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी!

    March 10, 2026

    पोलिस कॉन्स्टेबलने संपविले जीवन!

    March 9, 2026

    भारनियमनामुळे बळीराजा हतबल!

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.