Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»युट्यूबवरून चोरीचे धडे घेणारी ‘लेडी स्नॅचर’ अखेर जेरबंद !
    गुन्हे वार्ता

    युट्यूबवरून चोरीचे धडे घेणारी ‘लेडी स्नॅचर’ अखेर जेरबंद !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 30, 2025Updated:November 30, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    युट्यूबवरून चोरीचे धडे घेणारी ‘लेडी स्नॅचर’ अखेर जेरबंद !

    शनिपेठ पोलिसांनी बरेलीहून केली अटक ; बाफना, भंगाळे,गाडगीळ ज्वेलर्समधून लांबविल्या होत्या अंगठ्या

    जळगाव प्रतिनिधी शहरातील आर.सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या नामांकित सुवर्णपेढ्यांमधून तब्बल ४.७० लाख रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या हातचलाखीने बुचकळ्यात टाकत लंपास करणारी लकी शिवशक्ती शर्मा (३८, रा. बरेली, उत्तरप्रदेश) ही कुख्यात ‘लेडी स्नॅचर’ अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकली. युट्यूबवरील क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया यांसारख्या मालिकांमधून चोरीचे तंत्र शिकत ती मागील दहा वर्षांपासून विविध राज्यांमध्ये सोन्याच्या दुकानांना लक्ष्य करीत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

    ऑक्टोबर महिन्यात जळगाव शहरातील सुवर्णपेढ्यांमध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या चोरीच्या घटनांनंतर जिल्हापेठ आणि शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला महिलेचा स्पष्ट चेहरा पोलिसांसाठी महत्त्वाचा ठसा ठरला. तांत्रिक तपासाच्या आधारे ती उत्तरप्रदेशातील बरेली येथील असल्याचे निष्पन्न झाल्यावर निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी प्रदीप नन्नवरे, वैशाली पावरा व निलेश घुगे यांच्या पथकाने बरेली येथे छापा टाकत तिला जेरबंद केले.

    चोरीपूर्वी सोन्याच्या शोरूम्सची लोकेशन शोधण्यासाठी गुगल मॅपचा आणि चोरीच्या पद्धतींसाठी युट्यूब व्हिडीओंचा वापर करणारी ही महिला संगठितपणे काम करीत असे. दुकानात गेल्यावर अंगठ्या पाहण्याच्या बहाण्याने ती ग्राहकांचे लक्ष विचलित करून गुपचूप खिशात ठेवत असे. बनावट अंगठ्यांवर लावण्यासाठी तिने विविध दागिन्यांची जुनी लेबले, क्यूआर टॅगही चोरून ठेवले होते, हे तपासात पुढे आले.

    जळगावातील गुन्ह्यांनंतर ती थेट नागपूरला गेली आणि खंडेलवाल ज्वेलर्स व लोंदे ज्वेलर्सना लक्ष्य केले. मात्र जळगाव सराफ असोसिएशनने राज्यभर पाठविलेल्या सावधानतेमुळे नागपूरमधील सराफ सतर्क झाले. तिने अंगठ्या चोरण्याचा प्रयत्न करताच तिच्या हालचालींवर संशय घेऊन मालकांनी तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे नव्याने गुन्हा दाखल झाला नाही, मात्र तिच्या गुन्हेगारी पद्धतीची पुष्टी झाली.

    हरियाणा, हिमाचल प्रदेश, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव अशा विविध ठिकाणी तिने अशाच प्रकारे सोन्याची चोरी केल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत उघड झाले आहे. पोलिसांच्या मते तिच्या गुन्ह्यांचा व्याप आणखी मोठा असण्याची शक्यता आहे.

    सीसीटीव्हीच्या धाग्यावरून केलेल्या या कारवाईने शहरातील सुवर्णव्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांनी सतत नवी तांत्रिक सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #bareli #crime #shanipeth police jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif