जळगाव ;-बारावीच्या परीक्षेत जळगाव जिल्हा नाशिक विभागात दुसऱ्या क्रमांकावर असून जळगाव जिल्हाचा निकाल ९४.८८ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील ४५ हजार ३१ विद्यार्थ्यांपैकी ४४ हजार ८१९ विद्यार्थी बारावीच्या परिक्षेत प्रविष्ठ होते. त्यापैकी ४२ हजार ५२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परिक्षेत प्रविष्ठ विद्यार्थ्यांना दि. ५ जून रोजी प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे.
नाशिक विभागात ७३ हजार ३०२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. होती. त्यापैकी ७२ हजार ९१७ विद्यार्थी प्रविष्ठ असून ६९ हजार ३५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. नाशिक जिल्ह्याचा ९५.१२ निकाल लागला आहे. तर जळगाव जिल्ह्यात ४५ हजार ३१ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. त्यापैकी ४४ हजार ८१९ विद्यार्थी प्रविष्ठ असून ४२ हजार ५२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जळगाव जिल्ह्याचा ९४.८८ टक्के निकाल लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यात १६ हजार ८४३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १६ हजार ७७५ विद्यार्थी प्रविष्ठ होते. १५ हजार ७६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९४.१० टक्के निकाल लागला आहे. धुळे जिल्ह्यात २२ हजार ८५४ पैकी २१ हजार ३७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९३.५२ टक्के निकाल लागला आहे. जळगाव जिल्ह्यात सायन्समध्ये १३ हजार ८९९ मुले तर ९ हजार ६७३ मुली असे एकूण २३ हजार ५७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी जळगाव जिल्ह्यात ९८. २५ मुलांनी तर ९९.०९ मुलींनी बाजी मारली आहे. आर्टस् शाखेत १४ हजार ९९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ हजार ८५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात १३ हजार २४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुलांचा ८६.०२ टक्के तर ९२.६४ टक्के मुलींचा निकाल लागला आहे. कॉमर्समधून ४ हजार ९५६ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. ४ हजार ९३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४ हजार ७६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुलांचा ९५.७५ टक्के तर मुलींचा ९७. २७ टक्के निकाल लागला आहे. एचएससी व्होकेशनलमधून १ हजार ४७९ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. १ हजार ४५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार २७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुलांचा ८६.६६ टक्के निकाल तर मुलींचा ९०.४२ टक्के निकाल लागला आहे. सायन्स, आर्टस्, कॉमर्स यासह सर्वच विभागात मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे.
चोपडा तालुका टॉपर बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर चोपडा तालुक्याचा ९७.१५ टक्के निकाल लागला आहे. यंदा जिल्ह्यातून चोपडा तालुका टॉपर असून दुर्सया क्रमांकावर भडगाव ९६.१४ टक्के तर ९६.११ टक्के निकाल मिळून तिर्सया स्थानावर जळगाव शहर आहे. धरणगाव तालुक्याचा ९६.०२ टक्के निकाल लागून चौथ्यास्थानी आहे. तर अमळनेर तालुक्याचा ९५.९२ टक्के निकाल लागला असून पाच क्रमांकावर आहे. त्यानंतर पाचोरा ९५.५० तर भुसावळ तालुका-९५.०६ तर जामनेर ९४.५२, मुक्ताईनगर तालुका- ९४.७६,यावल तालुका- ९४.६२ टक्के निकाल लागल्याने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.