ज्येष्ठ स्वंसेवक प्रभाकर उर्फ बापुराव मांडे यांचे निधन
भुसावळ प्रतिनिधी:
महेंद्र प्रभाकर मांडे ऊर्फ सोनु मांडे यांचे वडील, तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वंसेवक प्रभाकर उर्फ बापुराव मांडे यांचे आज रविवार दि. १६ मार्च रोजी पहाटे ५:३० वाजता वृध्दपकाळामुळे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले.
बापुसाहेब मांडे यांनी आपल्या कार्यकाळात कृषि क्षेत्रात वनश्री पुरस्कार मिळविला व शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात मोठा ठसा उमटवला. ते एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते, ते मार्गदर्शक म्हणून सर्वांना प्रेरित करत राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकापासून वरच्या पदांपर्यंत त्यांनी अनेक महत्त्वाची जबाबदारी उत्तमरीत्या निभावली आहे.
अंगणवाडीपासून प्राथमिक, माध्यमिक, विद्यामंदिर आणि आश्रम शाळा यामध्ये ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेद्वारे त्यांनी पदभार सांभाळला. आपल्या कार्यामुळे त्यांनी सर्व क्षेत्रात नावलौकिक मिळविला. त्यांनी शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनींना सुसंस्कारित करण्याचे कार्य केले.
उद्या अंत्यसंस्कार
अंत्यदर्शनासाठी दिनांक १७ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ वाजता मु.पो. हरीपुरा, ता. यावल, जि. जळगाव येथे त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.