लक्ष द्या ! जूनमध्ये तब्बल ‘इतक्या’ दिवस बँकांना सुट्टी

पाहा संपूर्ण यादी

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उद्यापासून जून महिना सुरु होत असून तुमचीही बँकेची कामे असतील तर ही बातमी नक्की वाचा. कारण जून महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्या तसेच रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश असतो. त्यामुळे या सुट्ट्या पाहूनच तुम्ही तुमच्या बँकेची काम आवरून घ्या. दर महिन्याच्या सुरूवातीला आरबीआय बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते असते.

‘या’ दिवशी बँकांना सुट्टी 

1 जून : मतदान असणाऱ्या  राज्यात बँका बंद

2 जून : रविवार

8 जून : दुसरा शनिवार

9 जून : रविवार

10 जून : श्रीगुरु अर्जुन देवजींच्या हौतात्म्य दिनानिमित्त पंजाबमध्ये बँका बंद राहणार आहेत.

14 जून : ओरिसामध्ये बँका बंद असणार आहेत.

15 जून : मिझोराम या ईशान्येकडील राज्यामध्ये YMA दिवस आणि ओडिशातील राजा संक्रांतीमुळे बँका बंद राहतील.

16 जून : रविवार

17 जून : बकरी ईद निमित्त काही राज्ये वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत.

21 जून : वटपोर्णिमेनिमित्त अनेक राज्यात बँका बंद राहणार आहेत.

22 जून : चौथा शनिवार असल्याने बँका बंद

23 जून :  रविवार

30 जून : रविवार

Leave A Reply

Your email address will not be published.