Sunday, November 27, 2022

बांगलादेशात ब्लॅकआऊट… संपूर्ण देश अंधारात…

- Advertisement -

 

- Advertisement -

ढाका, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

बांगलादेशातील वीज ग्रीडमध्ये बिघाड झाल्यानंतर, सुमारे 130 दशलक्ष लोक विजेशिवाय आहेत, जवळजवळ संपूर्ण बांगलादेश अंधारात बुडाला आहे, देशाच्या मोठ्या भागात वीज नाही. मंगळवारी या पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाला. सरकारी वीज कंपनीने सांगितले की, देशातील 80 टक्के भागात दुपारी 2 वाजता अचानक वीज गेली. बांगलादेशच्या उत्तर-पश्चिम भागातील काही भाग वगळता उर्वरित देश अंधारात राहिला. बांगलादेशच्या सरकारी वीज एजन्सीचे प्रवक्ते एहसान यांनी सांगितले की, पॉवर ग्रिड बिघडण्याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. त्याची पडताळणी केली जात आहे.

बांगलादेश गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरात ऊर्जेच्या किमती वाढल्या आहेत. बांगलादेशचे कनिष्ठ तंत्रज्ञान मंत्री जुनैद पलक यांनी फेसबुकवर सांगितले की राजधानी ढाकामध्ये रात्री 8 वाजेपर्यंत वीज परत येईल. ढाकामध्येच सुमारे 22 दशलक्ष लोक राहतात.

या दक्षिण आशियाई देशात लांबलचक ब्लॅकआऊटमुळे जनतेमध्ये रोष आहे. बांगलादेशला देशातील विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे आयात केलेले डिझेल आणि गॅस खरेदी करण्यात अडचणी येत आहेत. नोव्हेंबर २०१४ मध्ये बांगलादेशला अचानक मोठा ब्लॅकआऊट झाला. त्यावेळी देशातील 70 टक्के भाग सुमारे 10 तास वीजविना होता.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या