लोकशाही न्युज नेटवर्क
परभणी – एसटी ८ आणि ९ जून २०१८ रोजी पुकारलेल्या संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून दणका देण्यात आला आहे. सदरील कर्मचाऱ्यांची दोन दिवसाचे वेतन राज्यातील सर्व विभाग नियंत्रक यांना महामंडळाचे महाव्यवस्थापक अभिजीत गायकवाड यांनी दिल्या आहेत. सदरील वेतन दोन महिन्याच्या पगारी मधून कपात केले जाणार आहे. एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
२०१८ च्या जून महिन्यामध्ये ८ आणि ९ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होत. संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करावी यासाठी औद्योगिक न्यायालयामध्ये खटला चालवण्यात आला होता. औद्योगिक न्यायालयाने जे कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले आहेत त्या कर्मचाऱ्यांची एका दिवसास दोन दिवस याप्रमाणे वेतन कपात करावी, अशा सूचना एसटी महामंडळ प्रशासनाला दिल्या होत्या.
मात्र दसरा आणि दिवाळी सण असल्यामुळे संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन कपात केल्यास त्यांना सणासुदीच्या काळात अडचणीचा सामना करावा लागेल, यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाने त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यासाठी दिली होती.
आता ही स्थगिती एसटी महामंडळ प्रशासनाने उठवली असून संपामध्ये सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतन कपात करावे, अशा सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रण यांना एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक अभिजीत गायकवाड यांनी दिल्या आहेत. एसटी महामंडळाने वेतन कापत करण्याचा निर्णय घेतला असल्याने संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना हा चांगला दणका मानला जात आहे. एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Trending
- निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
- ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
- नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
- जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
- अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
- वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
- दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
- बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

