मयताच्या बनावट स्वाक्षर्‍यांद्वारे शासनाच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

0

जळगाव :– सॉ मिलचे मालक मयत झाले असतानाही त्यांच्या नावाने खोटे कागदपत्रे व बनावट स्वाक्षर्‍यांद्वारे सॉ मिलच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आल्याची बाब उघडकीस आली असून या प्रकरणी मयत सॉ मिल मालकाच्या मुलाविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसिक रावजी पटेल (जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

शिवाजी नगरात अंबिका सॉ मिलचे मालक रावजी अर्जून पटेल होते. रावजी पटेल यांचे 1983 मध्ये निधन झाल्यानंतर रावजी पटेल यांचा मुलगा रसिक रावजी पटेल याने 1983 पासून ते 2020 पर्यंत अंबिका सॉ मिलचा दरवर्षी परवाना नूतनीकरण केला व त्यासाठी बनावट कागदपत्रे व सह्यांचा वापर करून वनविभाग, जळगाव यांची व पर्यायाने शासनाची फसवणूक केली. या संदर्भात एकाने जळगाव वनविभागाच्या कार्यालयात तक्रार अर्ज केल्यानंतर मुळ मालक रावजी अर्जून पटेल यांचे निधन 1983 मध्ये निधन झाल्याचे नमूद केले होते. शिवाय आतापर्यंत केलेला सॉ मिलचा घेतलेला परवाना हा बनावट कागदपत्रे व खोट्या सह्यांचा वापर करून बनवण्यात आल्याचे नमूद केल्याने वनविभागाने तक्रारीची दखल घेत कर्मचार्‍यांमार्फत चौकशी केली असता महापालिकेने दिलेल्या मृत्यू दाखल्यावरून मूळ मालक रावजी पटेल यांचे 1983 मध्येच निधन झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून वनविभाग परीक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिल्यानंतर रसिक रावजी पटेल याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.