Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळणार!
    कृषी

    केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळणार!

    केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा पाठपुरावा : इन्शुरन्स कंपनीसोबत बैठक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 1, 2026No Comments385 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    रावेर लोकसभा मतदारसंघासह जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि हवामानातील अनियमित बदलांमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या पुढाकाराने केंद्रीय कृषी मंत्रालय आणि ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना भरपार्इ देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

    बैठकीस केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक चंद्रजित चटर्जी, एआयसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई शक्य तितक्या लवकर मिळावी, यासाठी मंजुरी प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या बैठकीत जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कम विनाविलंब थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. विमा अर्जांतील नावातील चुका, क्षेत्रफळातील विसंगती आणि इतर तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यावर भर देण्यात आला.

    नुकसानीचे अधिक अचूक मूल्यांकन होण्यासाठी स्थानिक पातळीवर हवामान केंद्रांची संख्या वाढविण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली. केवळ प्रमुख हवामान केंद्रांवरील नोंदींवर अवलंबून न राहता, संबंधित महसूल मंडळ किंवा स्थानिक परिसरातील हवामान नोंदीही पीक नुकसानीच्या मूल्यांकनासाठी ग्राह्य धरण्याची मागणी करण्यात आली. केळी उत्पादक शेतकऱ्यांना अधिक व्यापक संरक्षण मिळावे यासाठी पीक विमा योजनेत खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली.

    बैठकीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या केळी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे, डेटा संकलन आणि विमा दाव्यांच्या प्रक्रियेला गती देण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करत पात्र शेतकऱ्यांपर्यंत विमा लाभ वेळेत पोहोचवावा, यावर विशेष भर देण्यात आला.

    केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलांमुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या हक्काची पीक विमा भरपाई वेळेत मिळणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या सर्व संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधत आवश्यक पाठपुरावा केला जाईल. शेवटच्या पात्र शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचेपर्यंत हा प्रयत्न अविरत सुरू राहील.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    शाश्वत शेतीचा ‘स्वामीनाथन मार्ग’!

    August 11, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif