विहिरीत पडून दोन मजूरांचा मृत्यू

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील बामणोद येथे विहिरीत पडून दोन मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बापूर काशीराम कानळजे आणि भाऊलाल रामदास भिल दोन्ही रा. मोयखेडा दिगर ता. जामनेर असे मयत झालेल्या मजूरांची नावे आहे. याप्रसंगी फैजपूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावल तालुक्यातील बामणोद गावातील झांबरे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू असतांना दोर बांधलेला लोखंडी खुंटा अचानक उपटल्याने काम करणाऱ्या बापूर काशीराम कानळजे आणि भाऊलाल रामदास भिल हे दोन्ही मजूरांचा तोल गेला. यामुळे हे दोन्ही मजूर विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना गुरूवार १० मार्च रोजी रात्री १० वाजता घडली.

दरम्यान घटनास्थळी फैजपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर, पोउनिरी मोहन लोखंडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पो.ना. किरण चाटे, विकास सोनवणे, उमेश सानप हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रात्री अंधारात मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार असल्यामुळे शोध घेणे शक्य न झाल्याने सकाळी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.