वृध्दाला बांबूने मारहाण; गुन्हा दाखल

0

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

बामणोद शिवारातील केळीच्या बागातून म्हशी काढ असे सांगितल्याच्या रागातून वृध्दाला शिवीगाळ करून बांबूने मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरविंद धोंडू झोपे (वय ६५ रा. महाजन पुरी, यावल) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे बामणोद शिवारातील शेट गट क्रमांक ४५ मध्ये त्यांच्या मालकीचे शेत आहे. गुरूवार ३ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील केळीच्या पिकामध्ये सागर संतोष तायडे याने त्याचे म्हशी याने म्हशी चरण्यासाठी सोडल्या.

दरम्यान केळीच्या बागेत घातलेल्या म्हशी बाहेर काढ असे सागर तायडे याला सांगितले. याचा सागरला राग आल्याने शेतात बाजूला पडलेला बांबूने अरविंद झोपे यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करून दुखापत केली. व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी अरविंद झोपे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सागर संतोष तायडे रा. बामणोद ता. यावल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सोनवणे हे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.