लासगाव ता. पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
बांबरुड (राणीचे) येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनने आमदार किशोर आप्पा पाटील प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. जि. प. सदस्य पदमबापु पाटील, मा. सभापती पंढरीनाथ पाटील, एस. टी. सेनेचे जिल्हा अध्यक्ष नरेश पाटील, अवि पाटील, सुभाष तावडे, विनोद तावडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना जळगाव उप अभियंता एम एम पाटील शाखा अभियंता एस के बडगुजर सहाय्यक शाखा अभियंता निलेश पाटील यांच्या सह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
यात बांबरुड लोनवाडी रस्ता, शिवस्मारक, तेली समाजाच्या मंदिरासाठी सभामंडपाचे उद्घाटन, जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, कासमपुरा ते बांबरुड (राणीचे) ते जुन्ने रस्ता लाख प्रयत्न १४ कि. मी. च्या रस्ता मंजूर करण्यात आला आहे. पन्नास वर्षांपासून या रस्त्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होती. अखेरीस आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या दुरदूष्टी तीन शेतकरी व कार्यकर्ते यांच्या मागणीवरून ह्या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. एस. एस. पाटील कंन्ट्रक्शन ने ह्या कामाचे टेंडर घेतलें आहे.
या उद्घाटन सोहळ्यात प्रसंगी बांबरुड येथील आदर्श शेतकरी गणेश बाबुराव आढाव, ग्रामपंचायत सदस्य अशोक भिवसन बडगुजर, युवराज काळे, जयदेव जगतात, प्रकाश चौधरी, संजय परदेशी, रविंद्र गोराडे, तुषार आढाव, राजेंद्र जगताप, निलेश गवळी, मुराद तडवी, इश्वर शेवगे, रामलाल गरुड, मधुकर काटे, भागवत गुजर, विनोद बोरसे, पंकज आढाव, मधुकर कोकणे, बापु कोकणे, सुरेश पवळ, नामदेव जगताप, दिवाकर जगताप, बाळकृष्ण काटे, अनिल आढाव, भगवान जगताप रमेश चौधरी, राहुल गोराडे, सुभाष चौधरी, बारकु चौधरी, अर्जुन चौधरी, गजानन दारकोंडे, पुंजाराम चौधरी, लाला मेवाती, याकुब मेवाती यांच्या सह जुन्ने रस्त्यावर शेती असणारे शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मोठा फायदा
गेल्या पन्नास वर्षां पासून या रस्त्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होती. ही मागणी मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून कासमपुरा बांबरुड ते लाख असा रस्ता आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे.