जळगाव जिल्ह्याला ‘ बालस्नेही पुरस्कार -, 2024 ‘ ने मुबंईत केले सन्मानित

0

जळगाव जिल्ह्याला ‘ बालस्नेही पुरस्कार -, 2024 ‘ ने मुबंईत केले सन्मानित

जळगाव ;- जळगाव जिल्ह्याने बालहक्क संरक्षण आणि कुपोषण मुक्तीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘बालस्नेही पुरस्कार-2024’ ने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने या कार्याची दखल घेतली आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्या हस्ते आणि आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती सुशिबेन शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हा पुरस्कार स्विकारण्यासाठी श्री. आर. आर. तडवी – जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, श्री. हेमंत भदाणे – उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास, श्रीमती वर्षा वाघमारे – जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या तिघांना प्राधिकृत केले होते. या यशामध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या अथक मेहनतीला मान्यता मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांचे अभिनंदन केले असून हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.