Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा
    ताज्या बातम्या

    बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 15, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    भारत आणि पाकिस्तानमध्ये अजूनही तणाव सुरूच आहे. त्यातच पाकिस्तानच्या अंतर्गत मोठी घडामोड घडली आहे. बलूच नेते मीर यार बलोच यांनी आज पाकिस्तानपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची औपचारिक घोषणा केली आहे.

    त्यांनी सांगितले की, अनेक दशकांपासून सुरू असलेला हिंसाचार, माणसांना गायब करणे आणि मानवाधिकारांचं उल्लंघन हे यामागचं कारण आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, बलुचिस्तानच्या लोकांनी आपला राष्ट्रीय निर्णय घेतला आहे. जगाने आता गप्प राहता कामा नये. त्यामुळे भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाने आम्हाला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. मीर यार बलोच यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून भावूक आवाहन करताना म्हटले आहे की, तुम्ही मारलं तरी आम्ही बाहेर पडू, कारण आम्ही आमचा वंश वाचवण्यासाठी झगडत आहोत. या आम्हाला साथ द्या. पाकिस्तानने कब्जा केलेल्या बलुचिस्तानमध्ये बलूच नेते रस्त्यावर आहेत. बलूचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही हा त्यांचा निर्णय आहे, तसेत याकडे जग मूकदर्शन बनून पाहत राहू शकत नाही.

    दरम्यान, भारतीय प्रसारमाध्यमे, यूट्युबर्स आणि बुद्धिजीवी मंडळींनी बलूच लोकांना पाकिस्तानचे लोक म्हणू नये. आम्ही बलूचिस्तानी आहोत, पाकिस्तानी नाही, असे आवाहनही त्यांनी केले. पाकिस्तानचे आपले लोक हे पंजाबी आहेत. त्यांना कधी बॉम्बहल्ले, जबरदस्तीने बेपत्ता करणे आणि नरसंहाराचा सामना करावा लागलेला नाही. यावेळी बलूच नेते मीर यार बलूच यांनी पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरवरील ताबा सोडण्याच्या भारताच्या मागणीला पाठिंबा दिला. आंतरराष्ट्रीय समुदायाने हा भाग रिकामी करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणवा अशी मागणीही त्यांनी केली.

    Balochistan Freedom
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026

    11 पुनर्वसित गावांच्या मालमत्ता नोंदींचा प्रश्न मार्गी!

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif