Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»हवामान»बळीराजा सावधान; चार दिवस वादळी पाऊस-गारपीट
    हवामान

    बळीराजा सावधान; चार दिवस वादळी पाऊस-गारपीट

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 3, 2026No Comments676 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव जिल्ह्यासह राज्यात दि.3 ते 6 मे दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती पिकांची काळजी घ्यावी, जेणे करून नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही.

    हवामान विभागाच्या कुलाबा, मुंबई केंद्राने शेतकऱ्यांसाठी हवामान बुलेटिन जारी केले आहे. त्यामध्ये गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्राला लागू असलेला अंदाज वर्तविला आहे. दि. 3 मेपासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. दि. 4 रोजी विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

    दि.5 ते 6 मे दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. कोकण व गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असा इशारा दिला आहे. दि.3 ते 6 मेला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता जळगावसाठी आहे, असा अंदाज दिला आहे.

    शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026

    आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif