Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»‘बाळासाहेबांचे विचार हेच माझ्या जीवनातील गुरुमंत्र’
    राजकारण

    ‘बाळासाहेबांचे विचार हेच माझ्या जीवनातील गुरुमंत्र’

    मंत्रालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 29, 2026No Comments87 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख गुरुवर्य बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याचा आवाज दिला, स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली आणि जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून देण्याचे बळ दिले. त्यांच्या विचारांची सावली आजही आमच्या डोक्यावर आहे. बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर निष्ठेने चालत जनतेची सेवा करत राहणे, हीच त्यांच्या चरणी अर्पण केलेली खरी गुरुदक्षिणा आहे,” असे भावनिक प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

    गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाला दिशा देणाऱ्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

    यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “आयुष्याला जन्म आई देते; मात्र आयुष्याला विचार, ध्येय आणि दिशा देणारा गुरु असतो. माझ्यासारख्या असंख्य शिवसैनिकांच्या मनात स्वाभिमान जागवणारे, अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देणारे आणि जनसेवेचा मार्ग दाखवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आमचे गुरु आणि अखंड प्रेरणास्थान आहेत.”

    ते पुढे म्हणाले, बाळासाहेबांचे विचार हे कोणत्याही पदापेक्षा मोठे आहेत. गोरगरीब, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची प्रामाणिकपणे सेवा करत राहणे, हीच त्यांच्या चरणी अर्पण केलेली माझी खरी गुरुदक्षिणा आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे बाळकडू घेत एका सामान्य शिवसैनिकापासून मंत्रिपदापर्यंतचा प्रवास करण्याचे भाग्य लाभल्याची भावना व्यक्त करत त्यांनी सांगितले, “आज सार्वजनिक जीवनात मिळालेली प्रत्येक जबाबदारी आणि जनतेने व्यक्त केलेला विश्वास यामागे बाळासाहेबांनी दिलेले विचार, संस्कार आणि संघर्षाची प्रेरणा आहे.”

    पुढे बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “बाळासाहेबांनी आम्हाला केवळ राजकारण नव्हे, तर माणसे जोडायला, संकटात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला आणि स्वाभिमानाशी कधीही तडजोड न करण्याची शिकवण दिली. त्यांचे विचार, त्यांचा करारी आवाज आणि शिवसैनिकांवरील पितृतुल्य माया आजही आमच्या हृदयात जिवंत आहे.”

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस

    September 16, 2026

    धनंजय मुंडे तातडीने रूग्णालयात दाखल

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif