पारोळ्यात आज ३८६ वर्षांची परंपरा लाभलेला बालाजी महाराजांचा रथोत्सव
‘लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज की जय’ च्या घोषाणे दुमदुमणार पारोळा नगरी
पारोळा I अशोककुमार लालवाणी
मागील ३८६ वर्षांची परंपरा असलेल्या शहरातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बालाजी महाराजांचा यात्रोत्सवातील महत्त्वाचा भाग म्हणजे रथोत्सव आज शुक्रवार दि ३ अक्टोंबर रोजी या रथोत्सवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
हा रथोत्सव म्हणजेच या संपूर्ण ब्रम्होत्सावातील पर्वणी असते हा रथोत्सव पाहाण्यासाठी देशातील विविध भागातून भाविक भक्त हजेरी लावतात देशातील सर्वात मोठा ४५ फुट उंचीचा हा रथ म्हणून या श्रींचा रथाची ओळख असुन जवळपास दिड टन वजनाचा हा रथ संपूर्ण सागवानी लाकडी असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संपूर्ण रथावर आकर्षक अशी आखिव रेखीव देव देवता ची चित्रे आहेत .
तसेच हा भला मोठा श्रींचा रथ कोणत्याही यंत्रा विना भाविकांन कडुन एका मोठ्या व जाड दोरीच्या सहाय्याने “लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज कि जय” च्या जयघोषात ओढला जातो या वेळी या श्रीं च्यां रथावर विविध प्रकारच्या फुलांनी व विद्युत रोषणाई ने सजविण्यात येते तसेच हि रथोत्सव यात्रा सुरू होते त्यावेळी रथा समोर शहरातील विविध व्यायाम शाळेचे लेझीम पथक,बॅंड,ढोल ताशे, तसेच महिला मंडळाचे लेझीम पथकांचे नृत्य हे सर्वांचे लक्ष वेधून घेतात याच दिवशी तिरूपती च्या धर्तीवर शहरात कल्याण कट्टा उभारण्यात येतो. या दिवशी अनेक भाविक हे अपले केश दान करण्यासाठी येथे व नवस फेडण्यासाठी येत असतात व आपले केश दान करीत असतात .
या दिवशी संपूर्ण परिसर हा भक्तीचा सागरात न्हावुन निघत असतो सकाळी रथचौकातुन विधीवत पूजा करून मोठ्या भक्तिभावाने हा श्रींचा रथ मार्गक्रमण करीत आझाद चौक, झपाट भवानी चौक, राममंदिर मार्गाने रात्री उशिरा आपल्या नियोजित ठिकाणी येत असतो.याप्रसंगी शहरात विविध प्रकारच्या वस्तू,पाळणे,लहान मुलांच्या खेळण्यांचे विक्रेते इथे येत आप आपली दुकाने थाटतात तसेच विविध खाद्यपदार्थाची देखील रेलचेल असते या श्रीं च्या ब्रम्हौत्सवाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी शांततेने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

