‘बहुआयामी सावित्रीबाई फुले’ : भाग : ९
मुद्दा ४ : मूळ वर्गवाद :
आज शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला भाव नाही. पण तो जगाचा अन्नदाता, पोशिंदा शब्दांनी विभूषित करून त्याचा झेंडा केला. पण तो वरकरणी तेव्हापासून आजपर्यंतही आहे. शेतीचा शोध लागला. त्याने एका बियाचे हजार दाणे कमावले. तरी तो जोखडातच. याचे उत्तर फ्रँकलिन, कार्ल मार्क्सने कॅपिटल पुस्तकात आणि भारताचा कार्ल मार्क्स महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचे आसूड या पुस्तकात दिले. जशी आज दाण्याची प्रतवारी, कापसाची प्रतवारी होऊ लागली; तशी १८२० ते १८९० या काळात शेतकऱ्याच्या मालामुळे वर्गव्यवस्था, वर्गवाद सुरू झाले. मोठा मासा लहान माशाला गिळतो. या पद्धतीने मालक-गुलाम, भांडवलदार-कामगार (युरोपच्या औद्योगिक क्रांतीची भर) यांचा वर्गसंघर्ष पेटला. मध्ये शेतकऱ्याची घुसळण झाली. त्याचे परिपूर्ण शोषण झाले. त्याचेच फळ ‘शेतकऱ्यांचे आसूड’ तयार झाले. १८८३ मध्ये महात्मा ज्योतिबांनी हे शेती वांग्मय लिहिले.
या भारतीय मूळ व्यवसाय शेतीमध्ये आधुनिकता यावी या दूरदृष्टीने निरक्षर अज्ञानी जनांना शिक्षणाची निकड ज्योतिबांना वाटली असावी. त्यासाठी शिक्षण देण्यामागील अडथळा शूद्र वर्गच नाही, तर गरीब ब्राह्मण वर्ग व बहुजन गरीब यांचे शोषण हा आहे. म्हणून ज्योतिबांनी शोषित शेतकरी, निरक्षर गरीब कष्टकरी यांना शिक्षित करून शहाणे करण्याची ब्रह्मगाठ बांधली.
मागासली आहे ती खरी स्त्री. हे तिच्यावरील कांड बंड करून मोडण्यासाठी आज सर्वश्रेष्ठ ठरलेली महामना वैराग्याची मूर्तिमंत पुतळा सावित्री फुले दिव्य आणि दूरदृष्टी घेऊन स्त्री शिक्षणाच्या यज्ञात आहुती ठरली.
मुद्दा ५ : जाणः
स्त्री शिक्षणामागील सत्य, मागासांच्या शिक्षणामागील सत्य, शूद्र वंचितांच्या शिक्षणामागील सत्य, उपेक्षित शेतकऱ्यांच्या शिक्षणामागील सत्य, भिक्षुकांच्या शिक्षणामागील सत्य आणि सर्वांच्या शोषणामागील सत्य हे बंडकर्त्या सावित्रींनी जाणून ‘स्त्रियांनाच प्रथम शिक्षण’ हा मानबिंदू ठरवून त्यासाठीच्या शिक्षणाचा ध्यास घेतला. ‘स्त्रियांना शिक्षण’ ही सावित्रींची ‘शिक्षणाची चौकट’ जगावर मात करते. भारतात ३५६ जाती. आणि जातवर्ग, वर्णभेद, वर्गवाद यासाठीचे युद्ध शिक्षणाच्या फक्त आणि फक्त साधनाने सावित्री-ज्योतिरावाने लढून अनादी काळापासूनच्या शोषकांना जगाच्या मैदानात हरवले आहे. भारत देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू ही आदिवासी स्त्री हे वैराग्याची मेरुमणी दूरदृष्टी सावित्रींच्या ‘स्त्रियांना प्रथम शिक्षण’ या १८३८ च्या अभियानाचे फळ आहे. कोण नाही म्हणेल? यावे त्यांनी पुढे. स्त्रियांच्या शिक्षणाचे अभियान चालवून सबंध पुणे व या शिक्षणगंगेच्या भोवतालच्या जनवानीला दिग्मुढ केले. स्त्रीमुक्ती केली ती सावित्रींनी. आणि टपाल शासनाने त्यावेळी अन्य दुसरीच्या नावाचे पोस्टाचे तिकीट काढले. श्रीकृष्णाख्यानात श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले, ‘आपले कर्म हे दुसऱ्याच्या नावावर मांडणारे लोक आहेत.’ हे खरे की खोटे हे वाचक पाहतील. आपला प्रश्न आहे त्यागी वैराग्यमूर्ती, स्त्री शिक्षणाचे अभियान चालवून स्त्रीमुक्ती करणाऱ्या सावित्री फुले यांचे पोस्टाचे तिकीट काढावे ही मागणी दिसते.
आता यक्षप्रश्न आहे तो असा की, स्त्री शोषणाचा मंत्र कोण म्हणाले? कोणत्या काळी म्हणाले? कसा मंत्र आहे? हे तरी शोधावे लागेल. बहुत मागे गेलो. आर्य आणि अनार्य यांचेतील वर्गवादामुळे युद्ध झाले. आर्य युद्ध जिंकले. त्यांनी अनार्यांच्या सुंदर स्त्रिया पळवून आपल्या कळपात घेतल्या. स्त्रीचे सुंदरत्व असणं तिला शाप आहे. तिचं अस्तित्वच धोक्यात आलंय. मुली पळवून नेणे हे कांड सुरू झाले आहे. हा मुद्दा आपण पुढे चर्चला घेणार आहोत. सुंदर स्त्रियांना आपल्या कळपात घेऊन त्यांचा बदला घेण्यासाठी छळ वागवा’ हा मंत्र त्यांनी स्वतः ही अंमलात आणला. कालांतराने त्या कुटुबाच्या सुरू केला. त्यांना ‘गुलामांच्या गुलाम आहेत आणि त्यांना गुलामासारखे घटक बनल्या. सुंदर असून आवडती दासी केली गेली. अमेरिकेच्या उटाह विद्यापीठात २००१ मध्ये भारतातील मानव अनुवंशावर संशोधन झाले. आर्य हे भारतीय नाहीत असे नमूद केले गेले. हा मुद्दा येथे घेण्याचा अर्थ असा की, झिरप पद्धतीने हा ‘गुलामी’ नावाचा स्रोत विसाव्या शतकात दोन तपे पुढे पुढे धावत आहे. कसा? त्याचे परिणाम काय? याची थोडीशीच टीप घेऊ.

वाघोड ता. रावेर
मो. ९५७९००६१५७