मुद्दा ३ : शाळा कां? तिला काय लागते?
आरंभी शुद्रांनी त्यांच्यावर लादलेली गुलामगिरी झुगारावी. यातून त्यांना मोकळे शुद्ध करावे. यासाठी डोळ्यात तेल घालून सावित्रीबाईने पावले उचलली. त्यासाठीचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. Charity begins at home. घरापासून सेवेच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी या न्यायाने सगुणाबाई क्षीरसागर व सावित्रीबाई फुले या प्रथम शिकण्यास उत्सुक झाल्या. त्या एकाच घरात राहात. चांगली बाग फुलवतात म्हणून गोऱ्याने त्यांना थोडी जमीन दिली होती. शूद्र शेती करतात. शेती ही अक्कलहुशारीने केली पाहिजे, म्हणून शेतात जाऊन आम्रवृक्षाखाली त्या दोघी पाटीविनाच आंब्याच्या काडीचा टाक (पेन) करून जमिनीवर अ ब क ड आणि कर व गमन बाराखडी काढून गिरवू लागल्या. मातीत अक्षरे दिसू लागली. आता मातीच्या दोन कच्च्या पाट्या त्यांनीच विनामोबदल्यात मिळवल्या. मग काय मजा गोडी लागली. कोणतेही काम पुढे पुढे जात जाते. कामाला गती मिळते. त्या ज्ञानाच्या वर्गाची उतरंडी चढून गेल्या.
मधून मधून घरात ज्योतिबांना सल्ले व अंदाजात घेत असत. आता फातिमा शेख ताई त्यांना येऊन मिळाल्या. सावित्रीबाई फुले म्हणाल्या- ‘का गं बाई आपण मुलींनाही शिकवू. यांची निरक्षरतेची जळमटं तरी जातील. गुलामी अनायसे सहजी घालवून टाकू. आत्मविश्वास वाढला. पण अध्यापन कला ज्ञात केली पाहिजे. म्हणून मग सावित्रीबाई व सगुणा दोन्ही पुण्यात मिचेल या विदेशी बाईच्या नॉर्मल प्रशिक्षण स्कूलमध्ये दाखल झाल्या. अध्यापनाचे शिक्षण प्राप्त केले. अध्यापनास सर्टिफाय झाल्या. १ जानेवारी १८४८ मध्ये बुधवार पेठेत पुण्याच्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा झक्कास सुरू झाली. इ.स. १८५३ मध्ये जेव्हा दक्षिणा सरकारी फंडातून ९०० रुपये दरमहा ग्रँट सुरू झाली. त्याआधी विनावेतन अध्यापक मिळवण्यासाठी कसरत केली.
मधल्या काळी अल्पोपहार, शैक्षणिक साहित्य, जागा, रूम्सला लागणारा सर्व खर्च ज्योतिबा फुले इस्टेटमधून केला जाईल. अहो दादा, आज पन्नास रुपये कोणी कबलायला तयार नाही. आणि ज्योतिबा फुले यांची तिजोरी शूद्र व मुलींच्या शिक्षणासाठी खाली होऊ लागली होती. ते यासाठी तयार होते. पण शिक्षण मुलींनी घेऊ नये. घेतले तर ती गृहिणी म्हणून राहणार नाही. तिच्यापुढे घरातील कामे करावी लागतील. पुरुष हा मालक राहणार नाही. तिची मनमानी चालेल. पतीला अपमृत्यू येईल. ती स्वैर वागेल. तिचे वळण बिघडू शकते. संस्कृती बदलेल वगैरे धोके शिक्षण देण्याने दाखविले. हे स्तोम सावित्रीबाईना हटवायचे होते. त्यासाठी त्यांनी स्त्रियांच्या उन्नतीचा ध्यास धरला. यामागे त्यांचा पूज्य सानेगुरुजींच्या भावासारखा भाव. सावित्रीबाईंच्या हृदयात दीन पददलित, पतीत आताचे वंचित तेव्हाही उपेक्षित होते. त्यांना उचलावे जवळ घ्यावे. अशी तळमळ, धग होती. हा दयेचा साक्षात्कार त्यांच्यात होता म्हणून? म्हणून इ.स. १८५० मध्ये ‘काव्यफुले’ची उधळण विचारपुष्पाच्या रूपाने झाली.
त्याचबरोबर ज्या शेतजमिनीची पाटी त्यांनी केली, त्या पाटीवर जे लिहिले, त्या शेतीकडे त्या वळल्या. आणि लिखाणाचा एक पैलू आधुनिक शेतीकडे त्याकाळी त्यांनी वाङ्गयातून चमकवला. पहा काव्यनिर्मिती. ‘काव्यफुले’ त म्हणाल्या –
ब्रह्म असे शेती
अन्नधान्य देती
अन्नास म्हणती
परब्रह्म
शूद्र करी शेती
म्हणोनि खाती पक्वान्न झोडती
अहं लोक
दारुडे बोलती
तैसे ते वागती
मतलब नीती
वाचाळांची
जे करिती शेती
विद्या संपादती
तवा ज्ञानवंती
सुखी करी

वाघोड ता. रावेर
मो. ९५७९००६१५७