Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकशाही विशेष»स्त्रीत्वाची कहाणी धन्य; मात्र पुरुषाची जबाबदारी कोणती?
    लोकशाही विशेष

    स्त्रीत्वाची कहाणी धन्य; मात्र पुरुषाची जबाबदारी कोणती?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 25, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    ‘बहुआयामी सावित्रीबाई फुले’ : भाग : ६

    मुद्दा २ : तेवी स्त्री संगे अवश्य घडे

    स्त्री हीच स्त्रीचे अंतरंग जाणे. सावित्रीजींनी त्याची उकल केली. अष्टावधानी आणि गृहिणी आहे स्त्री. कलेची जोपासना करणारी कलावंत. झोपायच्या वेळी जागणारी. खाट आडवी करते. अंथरुण करते. बाउतलं टाकते. जांभई देते. वाटते माऊली आता थकली. झोपतेय. बाई आडवी होते. मुल रडते. नींद गई जहन्नुम में. मुलाचे पटापटा मुके घेते. बाळाला स्तनपान करवते. विश्रांतीचा त्याग करते. कुटुंबाला सुख मिळावे. त्यात दुःख विसरते. पुन्हा उठते. मुलाला झोपवून. मुलांना, नवऱ्याला नित नवा घास ताटात घालावा. कुटुंबातील लहान मोठ्यांच्या गरजा पूर्ण करण्यात आणि अविश्रांत कष्ट करण्यात आयुष्य वेचावे. स्वतः अन्न खायला सवड नाही. सर्वत्र त्यागाची भूमिका निभवावी. बाकी सर्व दृगोचर करावे. धन्य ती स्त्रीत्वाची कहाणी.

    मग पुरुषाची तिच्याविषयी कोणती जबाबदारी? संरक्षकाची की सहाय्यकाची घ्यावी? कृतघ्नाची भूमिका पुरुषमंडळी घेत असतात. कामास उशीर झाला. काहीमाही चुकले की, मारझोड करतात. तेथे उलटसुलट कृती न करता संयम दाखवते ती स्त्री. त्याग, संयम, कष्ट आणि परोपकाराचा मूर्तिमंत पुतळा म्हणजेच स्त्री! सतत कामातील आई व बायको, बहीण ही तिची खरी ओळख पटते. घरात तशी नोकरी करणारी स्त्री ऑफिसमध्येही वरचढ न होता हार मानते. नमती भूमिका चालवते. मी स्त्री पुरुषांपेक्षा जास्त कल्पक, बुद्धिमान, कौशल्य, हरहुन्नरी आणि मेहनती असल्याचे कृतीतून पटवते. कामात आनंद नवऱ्याबरोबर राहण्यात नाही. काय ही नारी किमया? सावित्रीची लेक म्हणून शिकून तसा तिच्याशी वापर आहे का? पुरुष सुखाचे फक्त साधन. प्राचीन काळी विवाह होत नसत. त्यामुळे पुरुषाची इच्छा पूर्ण करावी. इतिहास आहे उद्धालक ऋषीच्या पत्नीने ब्राह्मण तरुणाकडे जाण्याची इच्छा केली. परिणाम असा झाला की, त्याचा मुलगा श्वेतकेतुने विवाह प्रथा सुरू केली. श्री शंकर महादेवाने पार्वतीशी विवाह करताना अंतरपाट धरला. परंपरा घडवली. चालवली.

    संत ज्ञानेश्वर म्हणाले, ‘जन्मते ती प्रसंगी, स्त्री देह शिवणे अंगे तेथूनी जन्म आघवे सोवळे कीजे भागवत प्रमाण आहे. ‘दीप रूपाते ति कोठे। पतंग जळोनि स्नेही बडे तेवी स्त्री संगे अवश्य घडे, पतन रोकडे अंधःमती ॥७७||’ अशी स्त्री जंजाळात रुतलेली. तिची विद्येच्या कुंजीने दलित हृदयसम्राट सावित्रीजींनी सोडवणूक केली. ‘स्त्रिया तसेच शुद्रांना विद्येचा अधिकार देऊन माणूसपण द्यावे’ हा परेडाइम पर्याय जगाला दिला. प्लेग, समाज, दुष्काळ, शेती या विषयावर त्यांनी ओरिजनल काव्याचे साधनही तेवत ठेवले. सर्वांच्या जीवनातून काळोख हटवून जीवनाला पहाट आणि प्रकाश दिला. वरील विषय सोडवण्यासाठी पाण्याच्या विहिरी कायम दिल्या. अन्नछत्रे दिली. उपासमार थांबवली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Female Male Savitribai Phule
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!

    November 9, 2026

    दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण

    November 8, 2026

    दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif