‘बहुआयामी सावित्रीबाई फुले’ : भाग : ४
आज विधानसभेत २४ आमदार स्त्रिया आहेत. कोणामुळे? स्त्री उन्नतीचे टारगेट घेतलेल्या सावित्री काकूबाईमुळे. पुलवामा अतिरेकी हल्ल्यानंतर भारताच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रतिहल्ल्यात हवाई सैन्याच्या लढाऊ विमानात सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी, उत्तुंगता व विश्वव्यापकता, शौर्याचा ठसा आदरणीय सावित्रीकाकू यांनी त्यांच्या लेकीवर उमटवला. हे जगासमोर दिलेले प्रमाणपत्र ठरावे! या लहान पुस्तकात मोठा व्यापक विचार मांडणे, बहुआयामी सावित्रीबाई फुले चरित्राची नव्या अँगलमध्ये उभारणी आहे.
१. धर्मांधता आणि जातीयतेची इको सिस्टीम (मेथड) या चरित्राने व जनता जनार्दनाच्या स्वीकार मूल्यामुळे भारतीय जनतेने नाकारली आहे.
२. कर्मकांडाचे दुकान बंद होऊन कुलूप लागल्याने शास्त्र पंडितांची तडफड होते आहे. हे दोन घसघशीत मुद्दे येथे निष्कर्षित केले आहेत.
सावित्रीकाकू फुले झंजावाती व्यक्तित्व. त्यांच्या अस्पृशोद्धाराच्या साधनेमुळे घटनेच्या १७ व्या कलमाद्वारे सरकारने अस्पृश्यता कायद्याने बंद केली. घटनेआधी १८४०-४८ मध्ये त्यांनी मोहोर लावली. खूप विरोधाचे कांदे फोडले गेले. परंतु दूरदृष्टीने राजकीय भावना म्हणून त्यांनी केले हे निश्चित. पण तरीही स्वार्थ हेतूने विरोधकांनी आधी स्वातंत्र्य राजकीय की सामाजिक? हा प्रश्न उपस्थित करून कामाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. ‘किरीकुंजर’ दोन्ही जीव समान आहे. हे स्त्रीवादी साहित्याची ४१ काव्य लिहून केशवसुतांच्या आधी सन १८५३ मध्ये ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ आणि सन १८९३ मध्ये ‘काव्यफुले’ लिहून तुतारी वाजविली. त्यांनी केलेल्या सर्व वैचारिक क्रांतीचे मूळ शैक्षणिक स्रोत त्यांनी गुंफले. त्यांनी आधुनिकतेच्या मशाली पेटविल्या आणि अंधारयुग संपविले.
समता परिषदेची जन्मदात्री सावित्रीकाकू फुले आहेत. ती परिषद जुनी करून टाकता कामा नये. वक्त्यांनी यासाठीची व्यासपीठे काबीज करा. प्रत्येक नारी सावित्रीकाकू म्हणून तयार व्हा. सोलापूर, इंदापूरपासून तळेगाव, देहू हा पवना नदीचा किनारा आम्ही ढवळला. मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूरपर्यंत हा विषय पोहोचविला. महाराष्ट्र, मध्यप्रदेशच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी महात्मा फुले पुस्तके (२ भाषा), ‘अमृतधारा’ संपादन आणि ‘विचारतीर्थ पत्रिका’, दिवाळी अंक काढले. सर्वश्रेष्ठ भारतीय नारी-सावित्रीबाई फुले आता चितारली. आता यापुढील भागापासून आपण मार्ग दाऊनी गेले आधी : ‘बहुआयामी सावित्रीबाई फुले’ या सदरातील विविध मुद्यांचा विचार करू..

वाघोड ता. रावेर
मो. ९५७९००६१५७

