Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकशाही विशेष»जीवनात येणाऱ्या समस्यांचा सामना शौर्य-धैर्य शांततेने करावा!
    लोकशाही विशेष

    जीवनात येणाऱ्या समस्यांचा सामना शौर्य-धैर्य शांततेने करावा!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 18, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    ‘बहुआयामी सावित्रीबाई फुले’ : भाग : ३

    सती असेल, अंधश्रद्धा, रुढी, कुप्रथा-मग दोरागंडा, लिंबू, मिरची, अंगात येणे ही अज्ञाने पळवून लावायची असतील. प्रौढ शिक्षणासाठी स्वतःच्या घरात रात्रशाळा असतील, भविष्यात शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना नंतर असेल, माता भ्रूणहत्या प्रतिबंध करण्यासाठीची बालहत्या प्रतिबंधक (१८५३ मध्ये) गृहांची स्थापना असेल, देवीदास पद्धत बंद करणे असेल, त्यासाठीचे लोकजागृतीचे प्रबोधन वर्ग असतील, बालविवाह, जरठकुमारी विवाह बंद करून केशवपण मुळातून नेस्तनाबूत केले असेल, विधवाविवाह, पुनर्विवाह असतील अशी सुधारणांची दालने कायमस्वरूपी उघडून दिली.

    दुष्काळात सर्वसामान्यांना लागणाऱ्या झळी रोखण्यासाठी त्या ढाल बनल्या. भूकबळी रोखण्यासाठी स्वतःची धान्य कोठारे उघडली. बायांच्या हातांना कामे देऊन अन्नछत्रालये सुरू केली. ज्यात नाही भ्रष्टाचार. नाही ताणतणाव? सर्वांचे दारू पिणे, व्यसनी पदार्थांचा अंमल हे सर्व बंद केले. १८९७ मध्ये भारतात आलेली महामारी प्लेगचे शोकनाट्य नरम केले.

    स्वतःचा मुलगा डॉ. यशवंत ज्योतिराव फुले यांना वैद्यांची टीम देऊन त्याला स्वतःच्या दवाखान्यातले रुग्णांची वाहतूक व उपचार करविले. त्यावेळी घोडागाड्या, टांगे ही वाहने व त्यांचा खर्च हे स्वयंभू म्हणूनच केले. अन्न-अन्न करणाऱ्या मुलामुलींना घास भरवले. दळणवळणावर नाकेबंदी केली. रोग वाढणार नाही असे निर्णय घेतले. इंग्रज रोगग्रस्तांना उचलून जनावरांसारखे फेकून देत. धास्ती धरत. शिपायांची अमानुष वागणूक थांबवून कलेक्टर यांना हुकूम काढायला लावून अलौकिकता सावित्रीकाकूंनी थांबविली.

    स्वतः त्यांनी स्वावलंबन अंमलात आणले व स्वावलंबनाचे धडे दिले. हे सर्व क्रांतीच्या पुढचे पाऊल त्यांनी टाकले. व्यवसाय व्यवस्थापनाचे, समाजरचनेचे त्यांनी उत्खनन केले. २० ते २१ मुक्त सीमा ठरवून उत्थापन केले. ‘शी’ म्हणजे ‘छी’ ही शिक्षणाची परंपरेची व्याख्या मोडीत काढून नवीन व्याख्या आणि शिक्षणाच्या निश्चित सीमा विश्वापुढे मांडल्या. आज सरकारे संशोधनपर शिक्षण पॅटर्न तयार करत आहेत. त्यांची नांदी, तांत्रिक व उद्योजक शिक्षण, सावित्रीकाकूंच्या शिक्षण लवादात पाहता येईल. केवळ सावित्रीबाई फुलेंचे नाव जुन्या विद्यापीठांना देऊन चालणार नाही. त्यांच्या कामाच्या पूर्ततेसाठी महिला विद्यापीठ नव्याने उभारावे लागेल. सावित्रीबाई फुले पीएच्. डी. चा विषय बनवावा. ‘आता विश्वात्मके देवे, तेणे शिक्षणयज्ञ तोषावे.’ मूलस्त्रोत अध्ययन संशोधन गुलामी संपुष्टिकरण सामाजिक दृष्टीतून समाज परिवर्तन व्हावे, असे करावे लागेल.

    हे चरित्र जीवन आणि मेरू पर्वताची उंची गाठलेली कर्तबगारी आहे. दोन हजार वर्षांपूर्वीची भारतीय सामान्य कुटुंबातील नारीचे शौर्य राष्ट्र उभारणी, समाज उभारणी, शिक्षण हे मुद्दे घेऊन राष्ट्र उभारणीचे प्रेरक व उद्बोधक चारित्र्य आहे. सावित्रीकाकूबाईनी आव्हान स्वीकारण्याचे सामर्थ्याची शिकवण गीतेतून घेतली. जीवनात येणाऱ्या समस्या, अरिष्टे, आव्हाने यांचा सामना शौर्य-धैर्याने व शांततेने करावा. मोह, माया, त्यागण्याचे शिक्षण गीतेत आहे. गीतेतला सिद्धांत ज्ञानयोग आहे. ज्ञानाने ज्ञान्याला परमशांती मिळत असते. परम शांतीतून आत्मज्ञान मिळाल्यावरच जीवनाचे उद्देश कळू लागतात. व्यक्तीचा अधिकार केवळ कर्तव्य करणे हा कर्मयोगाचा सिद्धांतही सावित्रीबाईनी प्रमुख स्थानी ठेवला. त्यांनी शूद्र, अतिशूद्र, दिनदलित, दुबळे, आबालवृद्ध, स्त्रिया यांना गीता सांगितली व गीतेची तालीम गिरवून करूनही घेतली. यापेक्षा स्त्रीचे आणखी कोणते श्रेष्ठत्व व अमोलिक मोठेपण स्त्रीचे कोणते असू शकते? वास्तवता लिंगभेद चिरडून टाकण्यासाठी समानता, समांतर पटावरील स्त्री उन्नत, स्त्रीप्रधान संस्कृती जगापुढे कायमची मांडून ठेवली.

    वि. ना. चौधरी
    वाघोड ता. रावेर
    मो. ९५७९००६१५७

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!

    May 12, 2026

    मातृदेवो भव… शब्दांच्या पलीकडचं एक अथांग अस्तित्व!

    May 12, 2026

    भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif