
‘बहुआयामी सावित्रीबाई फुले’ : भाग : २
ज्योतिबांनी सावित्रीला, सावित्रीने अस्पृश्य व स्पृश्य मुलींना शाळेत गेल्यावर म्हटले, ‘एक एकाचा एक तोंडाने म्हणा व ते लिहा.’ छात्र म्हणाला, ‘एक लिहिला.’ ‘आता दोन लिहा.’ लिहायच्या आत म्हणाला, ‘पुढे सगळे येईल? सावित्री काकूबाईनी केवळ माहितीची विद्या नाही दिली, करारी बनवण्याची, राष्ट्रीय विचाराची विद्या दिली.
वनराजीतील झाडाझुडपांना आपल्या अंगच्या सुवासाबद्दल चंदनास सांगावे लागत नाही. तो सुगंध धावतोच. जे अंतरंगात आहे ते बाहेर फर्दिशी येते. त्याला रोखले तरी रोखत नाही. किरण तेजस्वी आहेत, हे सूर्य स्वतःला सांगायला नाही जात. मेघ दिसताच मोर अहम् नाचू लागतो. जे खरे ते लपवता येत नाही. सावित्रीकाकूबाईचे असेच.
मरायचे संकट (अज्ञानी मरण) टाळायचे तर शिक्षण सागरात पहिली उडी घ्या. कोळ्याच्या फासातून मासा वाचेल. स्त्रिया-मुलिंबाबत विटीदांडूचा खेळ मात्र परंपरेने आलेला ठळकपणे जाणवत आहे. आज तर तो दोन हजार अडीच दशकात भयानक वाढला आहे. मुलींच्या अथवा मुलांच्यात कोणत्याही नातेसंबंधात सामाजिक चौकट रचली गेली नसावी. याने ही विटीदांडू नात्यांशी खेळली जाते आहे. हे यांच्या लक्षात न घेण्यासारखे एवढे कठीण नाही. नाते आणि विटीदांडूचा खेळ हे वेगळे आहेत. परंतु ते एकत्र करण्याची गल्लत होते आहे. हे चूक आहे. हे कधी विरंगुळा कधी तर कधी सहज घडतो. विरंगुळा हा रेटून करतात. ते लग्न करणे वगैरे नाते खोटी ठरवतात. कधी लग्न खरं समजले तर याची सुरुवात करताना दोन्हींची विशिष्ट जबाबदारी व कर्तव्य समजून घेत नाहीत. फक्त आकर्षण वाटते म्हणून लग्न घडू नये ते. त्याची कैफ तयार होते.
प्रेम हे त्यात नसल्याने विटी दुसऱ्याच मैदानात दांडूने उडवली जाते. प्रेम ही संकल्पनाच खोटी आहे. म्हणून लग्नाचा (नात्याचा खेळ) खेळ होत असतो. शारीरिक परिणामाबरोबर मानसिकताही बदलत जाते. प्रेमाचे नाते संपवले जाते. हे सोपे होत आहे. मुर्तीविषयी जसे नक्की प्रेम वाटायला-तसे मुलीलाही निवडलेल्या मुलाविषयी निर्णायक प्रेम वाटावे तरच नवल. हा मुद्दा आज मोठ्या प्रमाणात सामाजिक समस्या होऊन बसला आहे म्हणून येथे घेतला आहे. येथे सावित्रीकाकूबाईंचा स्त्री-पुरुष समानता आणि समरसतेचा मुद्दा लावून धरायचा आहे. यातून खूप शिकण्यासारखे आहे.
तत्कालीन कर्त्या विद्वानांच्या चुकीच्या निर्णयामुळे शिक्षण अधिकारांवर गदा आली. त्यांचे परंपरेचे प्रयोग आणि निष्कर्ष हे दोन टोकाला दोन गेले. प्रयोग ही निष्कर्षाची सुरुवात असते. तो निघाला नाही तर प्रयोगच फसला. त्यामुळे त्याची मुक्ताफळे आजपर्यंत स्त्रीजात भोगत आली आहे. उद्योजकता, संस्कृती, सामाजिकता, शिक्षण असे १५ ते २० आयाम लर्निंग इनिंग पॅटर्न ठरविल्याने, ‘तुम राष्ट्र बांधने का काम चाहते हो; हमने राष्ट्र बांधकर उसे उन्नत किया, ग्यान की चाबियाँ हाथों में देकर’ या ‘मोड’वर आले. सामाजिक आणि राष्ट्रीयत्वाची निष्कर्षित दूरदृष्टी व संशोधक दूरदृष्टी सावित्रीकाकूंच्या केलेल्या कामांच्या निश्चित सीमा उपयोगी पडल्या.
हातात हात मिळवून पुणे ते मुंबई रेल्वेलाईन टाकण्याचे काम असेल, उद्योगांना लागणारे कामगार संघटन असेल, शेतकऱ्यांच्या कोरडवाहू शेतीतून क्रांतीच्या पावलांनी पाणी आडवा, पाणी साठवा व त्यांचे पिकाला सिंचन असेल, शेतीमाल उत्पादन असेल, स्त्री सक्षमीकरणासाठी गुलामीचा पर्दाफाश करून त्याचे तीन तेरा, नऊ अठरा केले असतील. हे पुढील ठळक मुद्दे असतील. त्यासाठी परिश्रमपूर्वक कष्ट केले. तांत्रिक शेतीची सुरुवात असेल. केलेच!

वाघोड ता. रावेर
मो. ९५७९००६१५७

