‘बहुआयामी सावित्रीबाई फुले’ : भाग : १४
जसे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा जिजाऊंना धन्य मानावे लागेल, तसे ज्योतिबांपेक्षा कर्तबगार स्त्री म्हणून सावित्रीबाईना धन्यता द्यावी हे बुद्धिमानी ठरणार आहे. संकटे आली की, ती एकामागून एक येत जातात. तसे शाळा काढताना ज्या हालअपेष्टा भोगाव्या लागल्या, तशा पुन्हा या शाळांमध्ये जाताना धटिंग, मारेकरी यांचे संकट आले. ते गेले की वडिलांकडे वाळीत टाकण्याची धमकी. धर्मबुडवी सून आवरा. नाहीतर तुम्ही मेल्यावर तुमच्या प्रेतालाही कोणी पुणेकर शिवणार नाही. हे हल्ल्यामागून हल्ले येतच राहिले.
वाघीण असल्यावर प्रतिगामी विरोधक त्यांना शेळी-बकरी समजत. इंग्रजी सत्तेत वावरताना, गुलामाचे जोखड टाकणाऱ्यांना आव्हान देणे म्हणजे सिंहाच्या छाव्याला….. दहा-पाच सिंहांच्या आयाळातील केस ताणण्याचे काम करणे म्हणजे सिंहाच्या जबड्यात मान देण्याइतके घोर संकट होते. ‘ते काम’ परहितासाठी करणे हे क्रौयातले औदार्य असेल? याचा अंदाज लावू शकता?
अखिल पुण्यातील पौराणिक हिंदू (सनातनी) खवळले. गोविंदराव यांच्या घरी चिपळूणकर, कोल्हटकर, राजवाडे इत्यादी धर्मपंडित व त्यांच्या गुलामीत सौख्य मानणाऱ्या त्यांच्या बायका आल्या. ‘आहेत का गोविंदराव वाड्यात?’ त्यांनी आवेशात आरोळी ठोकली. डोक्यावर पेशवाई पगडी, अंगात बाराबंदाची बंडी, पायात जरीचे विंचवाच्या नांगी उगारलेले जोडे, हातात काठी होती. बाया नऊवारी पैठण्या नेसलेल्या. नाकात सोन्यामोत्यांच्या नथा, कपाळावर कुंकू लावलेल्या. भराभरा गोविंदरावांच्या भोवताली कडे करून उभ्या ठाकल्या. सगळ्यांच्या भुवया वर गेल्या होत्या.
‘काय म्हणता शास्त्रीजी? बसा शास्त्री आसनावर. कसं येणं केलं?’ ‘गोविंदराव, तुमच्या ज्योतीला आवरा. आमच्या पोरींना शिकवायला कोणी सांगितलं तुमच्या सुनेला? तिला राहायचं की नाही पुण्यात. तिला म्हणावं अब्रूचं जिणं असावं. महारामांगाच्या पोरांना शिकवून कोणत्या स्वर्गाचं तोरण तोडतेय ती? खिडकीतून जग बघायचं सोडा म्हणावं. हा शिक्षणाचा उद्योग सोडायला लावा, नाहीतर वाळीत टाकू, समजलं?’ भुवया वर चढवून पंडित बोलू लागले. त्यांनी कर्तबगार सुनेची निर्भत्सना का करावी?
‘गोविंदा, तुझी सून ऐकत नसेल, तर तिला घराबाहेर काढा.’ राजवाडेबाई म्हणाल्या, ‘उच्छाद मांडलाय त्यांनी घरोघरी हिंडते गावग्री विखार पसरवला त्यांनी पुण्यात. हाकला त्यांना घराबाहेर करा म्हणा तुम्ही तुमची राहायची तजवीज. गोविंदरावांनी नाकदुऱ्या काढून शास्त्री मंडळींना घरी रवाना केले.
गोविंदरावांनी जोतिराव व सावित्रींना खरी-खोटी सुनावली. दोघांत वाद झाला. दोघे फक्त अंगावरच्या कपड्यांनिशी घराबाहेर पडायला अखेर तयार झाले. पण मुलींच्या शिक्षणाचा वसा सोडायला तयार नव्हते. सावित्रीने लहाणिव घेतली.
ज्योतिबांनी स्नेहार्द वृत्तीने व विवेकाने सांगितले. बाबा बाहेर पडण्याची आज्ञा आम्ही मानतो. सावित्रीच्या शिक्षणाची भूक लागलेल्या या जगातील मुली तिच्या लेकी आहेत. सावित्री त्यांची आई आहे. ते एकमेकांपासून दूर होणार नाहीत. आम्ही दोघांनी शूद्र-दलितांसह सर्वांच्या उद्धाराचे रणशिंग फुंकले आहे. नाडलेले, पिडलेले दीनदुबळे आमचे देव आहेत. आम्ही यांना दूर करणार नाही. आणि त्यांनी घर सोडले.
त्यांची रहायचे घर, संसाराची भांडी, प्रपंचास लागणाऱ्या वस्तू एका मित्राने पुरवल्या. आणि सावित्रीबाई पूर्ववत शाळेत जाऊन चिखल, शेण, दगडधोंडे, शब्दांचे मारे सहन करू लागल्या. कामकाजात संघर्ष ऊर्जा देते म्हणतात हे खरे आहे. पूर्वसूरीची व्यापक विशाल दृष्टी या दोन्ही महात्म्यांना मिळाली होती हे खरे आहे. म्हणूनच त्यांनी खडतर जीवनाचा स्वीकार केला.
या मुलीची मी संरक्षक
महाराष्ट्र माझे गाव
सावित्री-ज्योती माझे नाव
‘मद, दंभ, मत्सर लयाला घालवा’ हा संदेश सावित्रीकाकूबाई फुले देतात. हळदीकुंकू समारंभ करणे, त्यांना गुळपाणी रसपान करणे या गोष्टींबरोबर सुसंवाद, संघटनेचे महत्व पटवून त्यांनी स्त्रियांची भारतात पहिली संघटना स्थापन केली. परीक्षा घेऊनच पुढचे वर्गात जाता येते. परीक्षा घेतली. त्या परीक्षांसाठी दादोबा पांडुरंग हे अधीक्षक नियुक्त झाले. मुख्य अध्यापिका सावित्री ज्योतिराव फुले. प्रत्येक शाळेत प्रत्येकी चार, तीन व एक असे शिक्षक अनुक्रमे ४८, ५१ व ३३ मुली शिकत होत्या. शिक्षिका फातिमा शेख, विष्णुपंत मोरेश्वर, विठ्ठल भास्कर, गणू शिवाजी मांग, धुराजी आप्पा चांभार हे होते. त्यावेळी या शाळांचे सर्वेसर्वा ज्योतिबा फुले. मुख्य संचालक सावित्रीबाई फुले. जगातील भारतातले हे चौथे आश्चर्य ‘शिक्षणाचे लेणे’ भारतातले असे होते.

वाघोड ता. रावेर
मो. ९५७९००६१५७